Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : धोनीने रॉयल्सविरूद्ध लगावला डाईव्ह, अन चाहत्यांना झाली २०१९ च्या वर्ल्ड कपची आठवण..!

मुंबई :
आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सोमवारी एक शानदार विक्रम नोंदविला. कर्णधार म्हणून त्याने सीएसकेसाठी आपला २०० वा सामना खेळला. हा एक विक्रम आहे, जो जगातील कोणताही खेळाडू करू शकलेला नाही. या सामन्यात त्याला फलंदाजीची संधीही मिळाली, तेव्हा त्याने १७ चेंडूत १८ धावा काढल्या. आतापर्यत धोनी फलंदाजी करताना क्रीजवर पोहचण्यासाठी डाईव्ह मारताना फारच क्व चितच दिसला. पण धोनी राजस्थानविरुद्ध डाईव्ह मारताना दिसला. त्याच्या चाहत्यांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी त्याची तुलना २०१९ च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीशी केली, तेव्हा धोनी धावबाद झाल्यामुळे टीम इंडिया स्पर्धेतून बाद झाली होती.

Advertisement

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जेव्हा अंबाती रायडू आणि सुरेश रैना यांच्या लागोपाठ विकेट्स गमावल्या तेव्हा धोनीचे क्रीजवर आगमन झाले. चेन्नईच्या डावाच्या १५ व्या षटकात धोनीने राहुल तेवतियाच्या ओव्हरमध्ये कव्हरच्या दिशेने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण नॉन-स्ट्राइक एंडवर उभा असलेल्या रवींद्र जडेजाने धाव घेण्यास नकार दिला आणि धोनी माघारी परतला. तो पुन्हा क्रीजकडे वळाला आणि त्याने डाईव्ह मारल्याने तो बचावला. धोनीने या सामन्यात डाईव्ह मारताच चाहत्यांना दोन वर्षांपूर्वीचा क्रिकेट वर्ल्ड कप आठवला.

Advertisement

इंग्लंडमध्ये २०१९ ला खेळल्या गेलेल्या विश्वचषकात धोनी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात धावबाद झाला होता. या सामन्यात धोनीने संघाचा डाव मोडकळीस आलेला असताना तो सावरला आणि संघाला विजयाच्या जवळ आणले. सामन्यात किवी फलंदाज मार्टिन गुप्टिलने त्याला धावचीत करुन कोट्यावधी भारतीय चाहत्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. धोनीचा हा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply