Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : धोनीने जडेजाला दिला ‘तो’ कानमंत्र; अन् बटलरची दांडी झाली गुल..!

मुंबई :
चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला बोल्ड आऊट केले अन सामन्याचे चित्रच पालटले. पण जडेजाच्या यशामध्ये धोनीचा हात असल्याचे समोर आले आहे. रवींद्र जडेजाने १२ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जोस बटलरला आपल्या जादुई फिरकीने व चलाखीने बोल्ड आउट करुन चेन्नई सुपर किंग्जला मोठे यश मिळवून दिले. जर जोस बटलर क्रीजवर थांबला असता तर त्याने राजस्थानकडे सामना झुकवला असता.

Advertisement

Kart Sanaik on Twitter: “MSD guided wicket of Jos Buttler. #CSKvRR #MSD #Jadeja https://t.co/I718gFt9OM” / Twitter

Advertisement

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी जोस बटलरला बाद करण्याची योजना संयुक्तपणे राबविली. वास्तविक, राजस्थानच्या फलंदाजीच्या वेळी चेंडूला दहाव्या षटकात बदलावे लागले. चेंडू थोडासा कोरडा होता. यानंतर, १२ व्या षटकात धोनी जडेजाला म्हणाला, ‘चेंडू कोरडा आहे, तो फिरेल.’

Advertisement

धोनीच्या म्हणण्यानुसार ड्राय बॉलमुळे फिरकीपटूंना मदत मिळेल. अशा परिस्थितीत जडेजाने धोनीचा कानमंत्र लक्षात ठेवला आणि अत्यंत चलाखीने बटलरला क्लीन बोल्ड केले. अशाप्रकारे धोनीच्या चाणाक्ष कॅप्टन्सीमुळे बटलरला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. धोनीने सामन्यानंतर सांगितले की, ओला चेंडूही फिरत होता, परंतु मिडविकेटवरुन फटका मारणे सोपे नव्हते. त्यामुळे त्याने चेंडू थोडा पुढे टाकावा अशी माझी इच्छा होती.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply