Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : दिल्लीसाठी आनंदाची बातमी; मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ खेळाडू झाला फिट..!

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटलचा युवा कर्णधार ंऋषभ पंतला चांगलाच आनंद झाला आहे. कारण या सामन्यात खेळण्यासाठी संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. इशांत पायाच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२१ मध्ये पहिले तीन सामने खेळू शकला नाही. तथापि, या सामन्यात पंत त्याला खेळवतो की विश्रांती देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इशांतच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती दिल्ली कॅपिटलचे प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी दिली होती. आता तो तंदुरुस्त झाल्यामुळे दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात आणखी एका स्टार गोलंदाजाची भर पडणार आहे.

Advertisement

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल संघाचा एक भाग असलेला इशांत शर्मा मागील आयपीएल हंगामात युएईमध्ये जखमी झाला होता आणि पहिला सामना खेळल्यानंतरच त्याला स्पर्धेतून बाहेर जावे लागले. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापासूनही दूर रहावे लागले. नंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन केले होते. परंतु यंदा आयपीएलमध्ये त्याला पुन्हा दुखापत झाल्यामुळे तो पहिल्या तीन सामन्यांना मुकला.

Advertisement

दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज मंगळवारी सामना होणार आहे. या मोसमात दोन्ही संघ प्रथमच समोरासमोर येणार आहेत. यापूर्वी आयपीएलमध्ये या दोघांमध्ये गेल्या मोसमातील अंतिम सामन्यात मॅच रंगली होती, त्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने दिल्लीला पराभूत करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले होते. दिल्ली संघाने या मोसमात पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. इशांत शर्मा इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत एकूण ९० सामने खेळला आहे. यात त्याने ७२ बळी घेतले आहेत.  त्याची सर्वोत्तम कामगिरी ही १२ धावा देऊन ५ गडी बाद करण्याची आहे. आयपीएलमध्ये इशांत शर्माचा इकॉनॉमी रेट ८.०९ आहे. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply