Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : ‘त्या’ टेनिस स्टाईल सिक्सरची सोशल मिडीयात चर्चा; पहा कोणी केली ही किमया..!

मुंबई :
आयपीएल २०२१ मध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर १८९ इतकी मोठी धावसंख्या उभी केली. चेन्नईचा संघ १३ व्या षटकांत ३ बाद १२० अशा चांगल्या स्थितीत होता, परंतु त्यानंतर चेतन साकारिया आणि ख्रिस मॉरिसच्या दमदार गोलंदाजीमुळे त्यांना शेवटच्या सात षटकांत ६८ धावा करता आल्या. चेन्नईच्या एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही. चेन्नईकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सॅम करनने ६ चेंडूत १३ धावा केल्या. यादरम्यान, त्याने टेनिसच्या शैलीमध्ये साकारीयाला षटकार ठोकला.

Advertisement

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
https://www.iplt20.com/video/232298/sam-curran-s-tennis-forehand-style-six

Advertisement

सॅमने टेनिस शॉटच्या शैलीत षटकार मारल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे चांगलेच कौतुक केले. या सामन्यात साकारिया राजस्थानचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३६ धावांत सर्वाधिक तीन बळी बाद केले. विशेष म्हणजे त्याने घेतलेल्या विकेटमध्ये सुरेश रैना, अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी अशी मोठी नावे आहेत. त्याच्याशिवाय ख्रिस मॉरिसने ३३ धावा देऊन दोन बळी घेतले.

Advertisement

फाफ डू प्लेसिसने चेन्नईकडून सर्वाधिक ३३ धावा केल्या. फाफने १७ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. याशिवाय अंबाती रायडू (२७) आणि मोईन अली (२६) यांनाही चांगली सुरुवात करुन मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ड्वेन ब्राव्होने दोन चौकार व एका षटकाराच्या मदतीने ८ चेंडूंत नाबाद २० धावा फटकावल्या. चेन्नईच्या धावसंख्येत १४ अतिरिक्त धावांचाही समावेश आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply