Take a fresh look at your lifestyle.

लसीकरणाचा अॅक्शन प्लॅन ठरला; त्यासाठी परदेशी लस मागवण्यात येणार..!

मुंबई :

Advertisement

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज खूप महत्वाचे निर्णय झालेले आहेत. त्यानुसार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यासह दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच परदेशातून लस मागवण्याचा अॅक्शन प्लॅन ठरला आहे.

Advertisement

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, लॉक डाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करणार आहेत. उद्या-परवाच त्यावर अधिकृतरीत्या घोषणा अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्रातील किमान 10 कोटी जनतेला लस देण्यासाठीचे नियोजन झालेले आहे. त्यासाठी देशातील कंपन्यांचा लोड लक्षात घेऊन परदेशी कंपन्यांची लस तातडीने बोलावली जाणार आहे.

Advertisement

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी आग्रहाने लावून धरली आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावला जावा अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणूनही अनेक रुग्णांना तो मिळण्यात अडचणी येत आहेत, यासह वाढत्या रुग्णासंख्येचा आकडा लक्षात घेऊन आता जनतेतून लॉकडाऊन होण्याची मागणी होत आहे. त्यावरही बैठकीत चर्चा झाली.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

TV9 Marathi on Twitter: “Maharashtra vaccination plan : महाराष्ट्राचा अॅक्शन प्लॅन ठरला, परदेशातून लसी मागवणार, 10 कोटींचं टार्गेट https://t.co/CMchuH65LM @OfficeofUT @rajeshtope11 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis #MaharashtraCurfew #LockdownMaharashtra #coronavaccination #CoronaVaccine” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply