Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : अखेर दहावीची परीक्षा रद्द; पहा कसे मिळणार विद्यार्थ्यांना गुण

पुणे :

Advertisement

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून परीक्षांबाबत सुरू असलेला संभ्रम अखेर मिटला आहे. केंद्रीय बोर्डाच्या धर्तीवर माहाराष्ट्र राज्यातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची माहिती दिली आहे.

Advertisement

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाल्यावर या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचे इंटरनल असेसमेंट होणार आहे. लवकरच याबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, असे मंत्री गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

Varsha Gaikwad on Twitter: “Given the worsening situation of the #Covid-19 pandemic, the Maharashtra government has now decided to CANCEL the state board exams for class 10th. The health & safety of our students and teachers is our topmost priority. #exams #ssc #hsc https://t.co/C8xCY3VVdX” / Twitter

Advertisement

बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता असून त्याबाबत अधिकृतरीत्या घोषणा झाल्यावरच मग वेळापत्रक प्रसिद्ध होईल. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि इतर मंत्र्यांनी या विषयावर आपले मत मांडले. त्यानंतर सर्वानुमते दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply