Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : म्हणून महाराष्ट्रात लागणार संपूर्ण लॉकडाऊन; पहा नेमका कधी जाहीर होऊ शकतो निर्णय

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झालेली आहे. याचे संपूर्ण अधिकार मंत्रीमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. त्यानुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मंत्री असलम शेख यांनी बुधवारी रात्री (21 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे संकेत दिले आहेत. याची शिफारस महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Advertisement

Hindustan on Twitter: “कल रात 8 बजे के बाद मुख्यमंत्री ने लॉकडाउन के बारे में निर्णय लिया है। इसकी घोषणा वे स्वयं करेंगे। वे स्वयं इसके बारे में निर्णय लेंगे: महाराष्ट्र के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे #MaharashtraFightsCorona https://t.co/6E6vCupnar” / Twitter

Advertisement

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आम्ही काल रात्री 8 वाजेपासून मुख्यमंत्र्यांना संपूर्ण लॉकडाउनसाठी अपील केले आहे. सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत विनंती केली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा लागेल. तर, मंत्री असलम शेख म्हणाले आहेत की, वैद्यकीय ऑक्सिजन नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. मंत्री शेख यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, वैद्यकीय ऑक्सिजन नसल्यामुळे महाराष्ट्र संपूर्ण लॉकडाऊनकडे जात आहे. यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येतील. ”

Advertisement

दि. १ मे पर्यंत महाराष्ट्रात कलम 144 लागू आहे आणि ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत सर्व अनावश्यक कामे व सेवांवर बंदी घातली आहे. आता महाराष्ट्र सरकारने कोविड मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल केला असून ते म्हणाले की आता राज्यात किराणा आणि खाद्यपदार्थांची दुकानेसुद्धा फ़क़्त 4 तासांसाठी सुरू आहेत. कर्फ्यू आणि शनिवार व रविवार मिनी लॉकडाऊन असूनही महाराष्ट्रातील कोरोना संक्रमण थांबलेले नाही. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply