Take a fresh look at your lifestyle.

म्हणून राष्ट्रवादीने शेअर केली फडणवीसांची वंशवेल; पहा नेमके कसे नाते आहे देवेंद्र यांचे तन्मयशी

पुणे :

Advertisement

45 वर्षांपेक्षा कमी वय असूनही करोना लसचे दोन्ही डोस घेतलेल्या 22 वर्षीय तन्मय यांचा मुद्दा महाविकास आघाडीला सापडला आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तन्मय हे आपले दूरचे नातेवाईक असून त्यांनी असे केले असल्यास चुकले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे. त्यातले ‘दूरचा नातेवाईक’ हा शब्द अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा झटका देणारा ठरला आहे. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी नेमके बोट ठेवले आहे.

Advertisement

NCP on Twitter: “ही वंशवेल पाहिल्यावर सख्ख्या काकांचा नातू हा जवळचा की दूरचा नातेवाईक, हे महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी ठरवावं. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #DevendraFadanvis #tanmayfadnavis #खोटं_बोल_पण_रेटून_बोल https://t.co/mUHvTNIBhx” / Twitter

Advertisement

अजूनही देशात लसीकरणाची वयोमर्यादा 45 असताना फडणवीस यांच्या 22 वर्षीय चुलत पुतण्याने लस घेतलीच कशी, यावरून अनेकांनी फडणवीस ट्रेंडमध्ये आहेत. तन्मय यांनी मुंबई येथील सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये पहिला तर, नागपूर येथील कँन्सर इन्स्टीट्यूटमध्ये दुसरा डोस घेतला आहे. महराष्ट्र काँग्रेसने तन्मय आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित फोटोंचे कोलाज तयार केले आहे. त्यात अनेक ठिकाणी तन्मय आणि देवेंद्र फडणवीस असे दोघेही आनंदाने दिसत आहेत. अशावेळी मग हे दूरचे नातेवाईक कसे ठरतात, यावर काँग्रेसने बोट ठेवले आहे. ‘फक्त माझे कुटुंब एव्हढीच माझी जबाबदारी!’ असे म्हणून काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलेले आहे.

Advertisement

तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसने फडणवीस यांची थेट वंशवेल प्रसिद्ध करून टाकली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे तन्मय हे नातू आहेत. फडणवीस यांचे त्यांच्याशी खूप जवळचे आणि जिव्हाळ्याचे नाते असल्याचे फोटोवरून दिसत आहे. कर्नाटक काँग्रेसचे तरुण नेते आणि युथ काँग्रेसचे प्रचारप्रमुख असलेल्या वाय. बी. श्रीवास्ता यांनी याबाबतचे पहिले ट्विट काल केले होते. त्यानंतर अनेकांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply