Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांचा ‘दुरचा नातेवाईक तन्मय’ काँग्रेसच्या रडारवर; पहा कोणती इमेज शेअर केलीय ट्विटरवर

पुणे :

Advertisement

45 वर्षांपेक्षा कमी वय असूनही करोना लसचे दोन्ही डोस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने घेतले असल्याचा मुद्दा सध्या ट्विटर ट्रेंडमध्ये आहे. कर्नाटक काँग्रेसचे तरुण नेते आणि युथ काँग्रेसचे प्रचारप्रमुख असलेल्या वाय. बी. श्रीवास्ता यांनी याबाबतचे पहिले ट्विट काल केले होते. त्यानंतर अनेकांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Advertisement

Maharashtra Congress on Twitter: “फक्त माझे कुटुंब एव्हढीच माझी जबाबदारी! @Dev_Fadnavis https://t.co/EPWAwaugpz” / Twitter

Advertisement

तन्मय यांचे वय अवघे 22 वर्षे आहे. अशावेळी अजूनही देशात लसीकरणाची वयोमर्यादा 45 असताना फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतलीच कशी, यावरून अनेकांनी फडणवीस काँग्रेसने जाब विचारला आहे. तन्मय यांनी मुंबई येथील सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये पहिला तर, नागपूर येथील कँन्सर इन्स्टीट्यूटमध्ये दुसरा डोस घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे तन्मय हे नातू आहेत. फडणवीस यांचे त्यांच्याशी खूप जवळचे आणि जिव्हाळ्याचे नाते असल्याचे फोटोवरून दिसत आहे. तरीही देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय यांना थेट दुरचा नातेवाईक करून टाकल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे. त्यामुळेच तन्मय यांचे फोटो, मिम्स आणि पोस्ट यांचा ट्विटरवर पाऊस पाडलेला आहे.

Advertisement

महराष्ट्र काँग्रेसने तन्मय आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित फोटोंचे कोलाज तयार केले आहे. त्यात अनेक ठिकाणी तन्मय आणि देवेंद्र फडणवीस असे दोघेही आनंदाने दिसत आहेत. अशावेळी मग हे दूरचे नातेवाईक कसे ठरतात, यावर काँग्रेसने बोट ठेवले आहे. ‘फक्त माझे कुटुंब एव्हढीच माझी जबाबदारी!’ असे म्हणून काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Raja Ravish Kumar on Twitter: “After seeing Instagram post, Devendra Fadnavis to #tanmayfadnavis : https://t.co/7ny1FASJcD” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply