Take a fresh look at your lifestyle.

म्हणून तन्मय फडणवीस आलेत ट्विटर ट्रेंडमध्ये; पहा मिम्सचा अन पोस्टचा कसा पडलाय पाऊस..!

पुणे :

Advertisement

Sanjari Haria on Twitter: “Scenes at Fadnavis residence today #tanmayfadnavis https://t.co/P1ZwDyHwSB” / Twitter

Advertisement

देशभरात करोना लस व रेमिडीसिवीर या औषधाचे राजकारण जोमात आहे. त्यातच आता 45 वर्षांपेक्षा कमी वय असूनही करोना लसचे दोन्ही डोस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने घेतले असल्याचा मुद्दा ट्रेंडमध्ये आहे. कर्नाटक काँग्रेसचे तरुण नेते आणि युथ काँग्रेसचे प्रचारप्रमुख असलेल्या वाय. बी. श्रीवास्ता यांनी याबाबतच्या माहितीचे ट्विट केल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असलेले तन्मय फडणवीस हे सर्वांना खऱ्या अर्थाने परिचित झालेले आहेत.

Advertisement

Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. on Twitter: “”नका बनवत जाऊ रे असे काहीsssssss😬😡 #णिसेद ह्याचा”. #Fraudnavis https://t.co/hEgR88656L” / Twitter

Advertisement

सध्या ट्विटरवर त्यांच्या नावाचा ट्रेंड चालू आहे. या मुद्द्यावरून सध्या देवेंद्र फडणवीस हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहेत. देशात सध्या लसीकरणाची वयोमर्यादा 45 असताना फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतलीच कशी, यावरून अनेकांनी फडणवीस यांना जाब विचारला आहे. तन्मय दूरचे नातेवाईक असून लसीकरण कधी आणि कसे केले हे माहित नाही. परंतु, जर नियमांचे उल्लंघन केले असेल तर ते चुकीचे आहे. सध्या माझ्या मुलीचे व पत्नीचेदेखील लसीकरण झाले नाही कारण ते त्यास पात्र नाही. नियम हे सर्वांना सारखे असायला हवे, अशी प्रतिक्रिया देऊन देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय यांना ‘दूरचे’ करून टाकलेले आहे.

Advertisement

Defeat fascism – 37 months to go on Twitter: “People who need vaccine vs People who want vaccine. #tanmayfadnavis @Dev_Fadnavis @drharshvardhan https://t.co/yDlKiHvRTz” / Twitter

Advertisement

तन्मय यांनी मुंबई येथील सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये पहिला तर, नागपूर येथील कँन्सर इन्स्टीट्यूटमध्ये दुसरा डोस घेतला आहे. तन्मय आणि देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतरचा एकत्रित फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे तन्मय हे नातू आहेत. फडणवीस यांचे त्यांच्याशी खूप जवळचे आणि जिव्हाळ्याचे नाते असल्याचे फोटोवरून दिसत आहे. तरीही देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय यांना थेट दुरचा नातेवाईक करून टाकल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे. त्यामुळेच तन्मय यांचे फोटो, मिम्स आणि पोस्ट यांचा ट्विटरवर पाऊस पाडलेला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Raja Ravish Kumar on Twitter: “After seeing Instagram post, Devendra Fadnavis to #tanmayfadnavis : https://t.co/7ny1FASJcD” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply