Take a fresh look at your lifestyle.

अकोले सर्वेक्षण : आरोग्याच्या मुद्द्यावर जनता नाराज; पहा नेमके काय म्हणणे आहे नेत्यांबद्दल

अहमदनगर :

Advertisement

‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण 2021’चा जिल्हानिहाय माहितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आता विधानसभा मतदारसंघनिहाय अहवाल प्रसिद्ध केला जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीबाबत त्या भागातील नागरिकांची काय भावना आहे. तसेच स्थानिक आमदार व खासदार यांच्या कामाबाबत नागरिकांनी नेमके काय म्हटलेले आहे. त्याबाबत माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये पहिला विधानसभा मतदारसंघ आहे अकोले.

Advertisement

डोंगर-दऱ्या आणि सह्याद्री पर्वताच्या कुशीत असलेला अकोले तालुका हा आदिवासी भागातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. मुंबई-ठाणे, नाशिक-सिन्नर व संगमनेर-पुणे लगतच्या भागातील हा पट्टा एकसमान हवामान असलेला नाही. या मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील काही अवर्षणप्रवण भागही येतो. सह्याद्री पर्वताच्या डोंगरावर वसलेल्या आदिवासी नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. या भागातील भंडारदरा आणि निळवंडे हे दोन्ही धरण प्रकल्प उत्तर नगर जिल्ह्याच्या शेती आणि नागरिकांची तहान भागवतात. मात्र, अकोल्याच्या पश्चिम आणि उत्तर पट्ट्याला त्याचा काही विशेष फायदा होत नाही. पावसाळ्यात जोरदार पाऊस आणि उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष याचाही काही नागरिकांना या भागात सामना करावा लागतो.

Advertisement

सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या तालुक्यात भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. अकोले-संगमनेर रस्त्याच्या भागात भाजीपाला आणि फळ शेतीचे आगार आहे. मात्र, येथील राजकारण मोठे अवघड आहे. बरीच वर्षे या भागावर माजी मंत्री मधुकर पिचड यांचे वर्चस्व होते. त्यांचा मुलगा वैभव हेही येथील माजी आमदार आहेत. मात्र, मागील निवडणुकीत या मतदारांनी बदलाची हाक देत भाजपमध्ये गेलेल्या पिचड यांना पराभूत करून राष्ट्रवादीत आलेल्या किरण लहामटे यांना विधानसभेत जाण्याची संधी दिली. आमदार लहामटे यांचा जनसंपर्क चांगला आहे. मात्र, करोना संकटात या आदिवासी भागामध्ये आरोग्य सुविधा मिळत नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे.

Advertisement
प्रश्न : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कामाबाबत आपण कितपत समाधानी आहात?
उत्तर : खूप समाधानी : 7 % समाधानी : 29 % असमाधानी : 64 %

पंचायत समिती सदस्यांबाबतही अशीच नाराजीची भावना आहे. उलट यापेक्षाही जास्त नाराजी त्यांच्याबद्दल असल्याचे नागरिकांनी म्हटलेले आहे. तसेच आमदारांच्या कामाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांना योजना न मिळणे, आरोग्य आणि शेतमालास योग्य भाव न मिळण्याच्या प्रमुख समस्या या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची भावना तरुणांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
प्रश्न : आपल्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांची कामगिरी कशी आहे?
उत्तर : बरी : 34 % असमाधानी : 27 % समाधानी : 39 %

जिल्हा परिषद सदस्यांबाबतच्या भावनेत सुषमा बाजीराव दराडे (समशेरपूर गट), जालिंदर वाकचौरे (देवठाण गट), कैलास वाकचौरे (धामणगाव आवरी गट) यांच्या कामाबाबत तुलनेने चांगली भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर, रमेशराव देशमुख (कोतूळ गट) आणि सुनिता अशोक भांगरे (राजूर गट) यांच्याबाबत बरे काम चालू असल्याची भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून थेट लाभाच्या योजना मिळत नसल्याची तक्रार सार्वत्रिक आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement

अगोदरच प्रसिद्ध झालेले ‘अहमदनगर सर्वेक्षण’ लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.krushirang.com/tag/survey/

Advertisement

पुढील विश्लेषण प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक असे :

Advertisement
सर्वेक्षणाच्या विश्लेषणातील बातमीचा विषयप्रकाशित होण्याचा संभाव्य दिनांक
विधानसभा मतदारसंघ : अकोलेदि. 20 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कोपरगावदि. 21 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : संगमनेरदि. 22 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शिर्डी (राहता)दि. 23 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीरामपूरदि. 24 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : नेवासादि. 25 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : राहुरीदि. 26 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शेवगाव-पाथर्डीदि. 27 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कर्जत-जामखेडदि. 28 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदादि. 29 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : पारनेरदि. 30 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अहमदनगर शहरदि. 1 मे 2021
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply