Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. क्रूरतेचा कळस; रेमडेसिवीरच्या बाटलीत पाणी टाकून न चालू होती विक्री..!

मुंबई :

Advertisement

सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन हा एक महत्वाचा मुद्दा बनलेले आहे. याची मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ राखण्यात सरकारला अपयश आलेले आहे. औषध खरेदीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात राजकारण चालू असल्याने हे औषध दुर्मिळ बनल्याने थेट काळाबाजारमध्ये महत्वाची वस्तू बनली आहे. परिणामी काहींनी याच्या बनावट बाटल्या विकण्याचा ‘उद्योग’ सुरू केलेला आहे. बारामतीनंतर आता कर्नाटक राज्यातही याचे असेच रॅकेट उघडकीस आलेले आहे.

Advertisement

देशात कोरोना संक्रमणादरम्यान रेमाडेसिविर इंजेक्शनचे काळेबाजारीकरणही जोरात आहे. कर्नाटकमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. त्याविरोधात स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. कर्नाटक पोलिसांनी म्हैसूर येथील एका परिचारिकाला रेमेडस्वीर इंजेक्शनच्या बाटलीत खारट पाणी आणि अँटीबायोटिक्स विकल्याबद्दल अटक केली आहे. या जीवनरक्षक औषधाची मागणी कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये वाढली असतानाच म्हैसूरचे पोलिस आयुक्त चंद्रगुप्त यांनी धक्कादायक घटनेची माहिती दिली आहे.

Advertisement

या ब्लॅक मार्केटिंग रॅकेटचा मुख्य सूत्रधार गिरीश नावाचा एक माणूस होता. जो रुग्णालयात कामाला होता. पोलिस आयुक्त चंद्रगुप्त म्हणाले की, विविध कंपन्यांकडून रुग्णालयात आलेल्या रेमेडिसवीरच्या बाटल्यांचे रिसायकल करून त्यात प्रतिजैविक आणि सलाईन भरून विकण्याचा उद्योग हे करीत होते. २०२० पासून म्हणजे मागील सहा महिन्यांपासून ते असे करून रुग्णांची फसवणूक करीत आहेत. पोलीस त्या रॅकेटच्या मुलाशी जाऊन चौकशी करत असून त्यांनी कुठे आणि कोणाला विक्री केली याचाही शोध घेतला जात आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply