Take a fresh look at your lifestyle.

‘दूरचे नातेवाईक’ तन्मयबाबत फडणविसांनी दिले असे उत्तर; पहा नेमके काय आहे नाते ते

नागपूर :

Advertisement

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी 45 पेक्षा कमी वय असतानाही करोना लसीकरण करून घेतले आहे. त्यावरून काँग्रेसने फडणवीसांवर आरोप केले आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची आपली भूमिका जाहीर केली आहे.

Advertisement

या मुद्द्यावरून सध्या देवेंद्र फडणवीस हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहेत. देशात सध्या लसीकरणाची वयोमर्यादा 45 असताना फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतलीच कशी, यावरून अनेकांनी फडणवीस यांना जाब विचारला आहे. काँग्रेसने यावर प्रश्न उपस्थित करतानाच भाजपजवळ रेमडेसिवीरसारखे लसीचा पुरवठा आहे का, असाही गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.

Advertisement

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तन्मय दूरचे नातेवाईक असून लसीकरण कधी आणि कसे केले हे माहित नाही. परंतु, जर नियमांचे उल्लंघन केले असेल तर ते चुकीचे आहे. सध्या माझ्या मुलीचे व पत्नीचेदेखील लसीकरण झाले नाही कारण ते त्यास पात्र नाही. नियम हे सर्वांना सारखे असायला हवे. याप्रकरणी टीका झाल्यावर तन्मय यांनी आपली काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांनी आपली पोस्ट डिलीट केली आहे. तर, फडणवीस यांनी ‘ते लांबचे’ असल्याचे सांगून टाकले आहे.

Advertisement

दरम्यान, तन्मय यांनी मुंबई येथील सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये पहिला तर, नागपूर येथील कँन्सर इन्स्टीट्यूटमध्ये दुसरा डोस घेतला आहे. तन्मय आणि देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतरचा एकत्रित फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे तन्मय हे नातू आहेत. फडणवीस यांचे त्यांच्याशी खूप जवळचे आणि जिव्हाळ्याचे नाते असल्याचे फोटोवरून दिसत आहे. तरीही देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय यांना थेट दुरचा नातेवाईक करून टाकल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply