Take a fresh look at your lifestyle.

कमी गुंतवणुकीत कमवा पैसाच पैसा; पहा पोस्टाची ‘ही’ योजना, इन्व्हेस्टमेंटसाठी उत्तम पर्याय

मुंबई :

Advertisement

कमीत कमी पैशांची गुतंवणूक (investments) करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या प्रयत्नात प्रत्येक जण असतो. त्यातून जादा पैशाच्या आमिषाने आपण कोणताही विचार न करता, फार काही माहिती न घेता, कुठेही गुंतवणूक करतो आणि बऱ्याचदा फसतो. मग डोक्याला हात लावण्याची वेळ येते. त्यामुळे गुंतवणूक करताना नेहमीच काळजी घेणे आवश्यक असते.

Advertisement

कोणतीही फसवणूक न होता, चांगला परतावा देणाऱ्या एखाद्या स्कीमच्या शोधात असाल, कमी गुंतवणुकीत जास्त नफा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसची (Indian Post) रिकरिंग डिपॉझिट (RD) अर्थात आवर्ती ठेव योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. त्यात गॅरंटी रिटर्न्ससह (guaranteed returns) तुमचे पैसे 100 टक्के सुरक्षित राहतात. तुम्हाला किमान 100 रुपयांनी खाते उघडता येते. मात्र, तुम्ही जर या योजनेत दर महिन्याला 10 हजार रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 16 लाखांहून अधिक रक्कम मिळू शकते.

Advertisement

रिकरिंग डिपॉझिटमध्ये दर महिना थोडीशी बचत केल्यास, तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दर महिना 100 रुपये जमा करणे गरजेचे आहे. या योजनेतील ठेवीची रक्कम 10 रुपयांच्या पटीत असावी. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. तुम्ही हा कालावधी पुढे वाढवूही शकता. बँकेला (banks) हा एक चांगला पर्याय आहे.

Advertisement

योजनेची वैशिष्टये!
– सिंगल आणि जॉईंट अकाऊंट (single / joint account) अशा दोन्ही अकाऊंटवर ही सुविधा मिळते. जॉईंट अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त 3 प्रौढ असू शकतात.
– तुम्ही 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावावर खाते उघडू शकता. मात्र पालकांनी ते राखणे आवश्यक आहे.
– स्कीमची मुदत 5 वर्ष असते. पण, मुदतीपूर्वी अर्ज केल्यास ती स्कीम तुम्हाला पुढील पाच वर्षे वाढवता येते.
यासाठी दर महिन्याला तुम्हाला किमान 100 रुपये जमा करावे लागतात.
– दिलेल्या वेळेत रक्कम जमा झाली नाही, तर प्रत्येक 100 रुपयांवर 1 रुपया दंड आकारला जातो.
– खाते उघडण्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर प्री-मॅचुअरली क्लोजरची सुविधादेखील मिळते.
– व्याजाचे (interest) दर तिमाही आधारावर बदलतात.
– आरडी खाते एका शाखेतून दुसर्‍या शाखेत हस्तांतरित केले जाऊ शकते.
– कर्ज घ्यायचे (loans) असेल तर ही सुविधा आरडीवरदेखील उपलब्ध आहे. एका वर्षानंतर आपण ठेवीच्या रकमेच्या 50 टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकता.

Advertisement

परतावा किती मिळणार?
गुंतवणूकदाराने 10 वर्षांसाठी दर महिना 10 हजार रुपये आरडीमध्ये जमा केले, तर 10 वर्षांनी तुमची रक्कम 12 लाख रुपये इतकी होते. त्याला दर वर्षाला 8.8 टक्के व्याज मिळते. व्याज चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते. त्यात तुम्हाला मॅच्युरिटीनुसार कमीत कमी 16.28 लाख रुपये परतावा मिळतो. म्हणजेच तुमचा 4.28 लाखांचा फायदा होतो.
संपादन – सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply