Take a fresh look at your lifestyle.

म्हणून केंद्र सरकारने ‘सीरम’ला दिले ‘इतके’ कोटी रुपये; पहा काय होणार त्याचा उपयोग

मुंबई :

Advertisement

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेलाच खीळ बसली आहे. भारताने रशिया, अमेरिका जपानसह काही देशांच्या लसीला परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही लसीकरण मोहिमेला वेग आलेला नाही. त्यामुळे या मोहिमेला गती देण्यासाठी मोदी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

अदर पूनावाला यांचे आवाहन
कोविड लस उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे 3,000 कोटी रुपयांचे अनुदान देण्याची विनंती केली होती. त्यास मोदी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एका विशेष मुलाखतीत पूनावाला म्हणाले होते, की सरकार ‘सीरम’सारख्या अनेक लस उत्पादकांबरोबर काम करत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी इतर नवीन मार्गांचा शोध घेत आहे.

Advertisement

४५०० कोटींचे क्रेडिट
देशात लसीकरण वाढविण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कोरोना लसउत्पादक ‘भारत बायोटेक’ (Bharat Biotech) आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) यांना पुरवठा क्रेडिट देण्यास अर्थ मंत्रालयाने मान्यता दिली. कोरोनासाठी प्रभारी नोडल मंत्र्यांना प्रथम क्रेडिट मंजूर केले जाईल. नंतर ते कोरोना लस तयार करण्यासाठी दोन कंपन्यांकडे सोपवले जाईल. मंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासाठी 3,000 कोटी, तर भारत बायोटेकसाठी 1,500 कोटी रुपयांचे क्रेडिट दिले आहेत.

Advertisement

उद्योग संघटनांशी चर्चा
पुणे स्थित लसउत्पादक ‘सिरम’च्या अपेक्षेनुसार जून 2021 पर्यंत त्यांची उत्पादनक्षमता वाढेल. दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले, की देशातील कोविड-19 व्यवस्थापनाबाबत ‘इंडिया इंक’च्या प्रश्नांसमवेत विविध उद्योग मंडळांसह चर्चा केली. सीतारमण म्हणाल्या, की साथीच्या रोगादरम्यान लोकांचे जीवन आणि जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसमवेत काम करत राहील.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply