Take a fresh look at your lifestyle.

कोरोनावरील उपचारासाठी पैशाची चणचण; काळजी नको, ‘अशी’ करा तजवीज!

मुंबई :

Advertisement

कोरोनाच्या विळख्यात अवघे जग सापडले आहे. दवाखाने फुल्ल झाले असून, एक एक बेड मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. फार प्रयत्न केल्यावर बेड मिळालेच, तर दवाखानाचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न पडतो. त्यातही आरोग्य विमा नसेल, तर विचारायलाच नको. मात्र, तुम्हाला कोरोनावरील उपचारासाठी काही ठिकाणाहून तजवीज करता येईल.

Advertisement

अनेक नोकरदार भविष्य सुरक्षित करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात गुंतवणूक करतात. आपल्या वेतनामधून काही रक्कम प्रॉव्हिडंट फंडाच्या रुपात कपात केली जाते. ही रक्कम आपल्या EPF खात्यात जमा होते. मात्र, पीएफची रक्कम सहजासहजी काढता येत नाही. त्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत. सध्या कोरोनावरील उपचारांसाठी अनेकांना पैशांची चणचण भासते आहे. तुमच्यापुढेही असाच प्रश्न असेल, तर काही अटींसह तुम्हाला ‘ईपीएफओ’मधून कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ठरवलेल्या निकषांनुसार वैद्यकीय कारणांसाठी (health reason), नवीन घर घेण्यासाठी (house purchasing), गृहकर्जाची परतफेड (home loan repayment) किंवा लग्नाच्या कारणांसाठी (wedding ceremony) कर्मचारी काही प्रमाणात पैसे काढू शकतात.

Advertisement

स्वतःच्या किंवा आपल्या परिवारातील सदस्याच्या कोविड उपचारासाठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. कोविडमुळे एखादा कर्मचारी किंवा त्याचे पालक, जोडीदार किंवा मुले आजारी पडल्यास सदस्य रक्कम काढू शकतात. कोविडसह इतर वैद्यकीय उपचारांसाठी एखादा कर्मचारी ईपीएफकडून पैसे काढू शकतो. या प्रकारच्या ईपीएफ पैसे काढल्यास कोणताही लॉक-इन पीरियड किंवा किमान सेवा कालावधी लागू होणार नाही.

Advertisement

आवश्यक कागदपत्रे
– कर्मचार्‍याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) असणे आवश्यक आहे.
– कर्मचार्‍याच्या बँक खात्याचा (bank account) तपशील त्याच्या EPF खात्याशी जुळला पाहिजे.
– ईपीएफचे पैसे त्रयस्थ व्यक्तिच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जात नाहीत.

Advertisement

किती रक्कम काढू शकतो?
– स्वतः, पत्नी, मुलं, आई-वडिलांवरील उपचारांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो.
– घर, जमीन खरेदीसाठी 90 टक्के रक्कम काढता येतात.
– आपल्या किंवा मुलांच्या लग्नासाठी 50 टक्के रक्कम काढू शकतो.
– नोकरी सोडली असेल, तर आपल्याला एका महिन्यानंतर 75 टक्के, तर उरलेली रक्कम दोन महिन्यानंतर काढू शकतो.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply