Take a fresh look at your lifestyle.

कृषी प्रश्नोत्तरे | विहिर पुनर्भरण करण्याचे हे आहेत प्रमुख उपाय; वाचा जलसंधारणाची माहिती

प्रश्न : विहिर पुनर्भरण कोणत्या वेगवेगळ्या उपायांनी करता येते?
उत्तर : विहिर पुनर्भरण वेगवेगळ्या उपायांनी करता येते त्यात प्रामुख्याने पुढील उपाय आहेत. ৭. विहिर के ओढयाच्या अंतरामध्ये १० फुट लांबीचे दोन स्वतंत्र खहड़े घ्यावेत, २. विहिरीपासुन पहिला खडडा १० फुट लांब, १० फुट रुद व १० फुट खोल घ्यावा. ३.या खड्ड्याच्या तळाशी एक आडवे छिद्र घेऊन पी.व्ही.सी. ४ इंच पाईपव्दारे हा खडड़ाविहिरीशी जोडावा. ४.या खडड्याच्या तळाशी २.५ फुट जाडीचा दगड गोट्यांचा थर भरावा. त्या थरावर २,५ फुट जाडीचा खडीचा धर भरावा. त्यानंतर २.५ फुट जाडीची वाळूची चाळ भरुन त्या धराबर पुतलेल्या वाळूची २.५ फुट जाडीचा थर भरुन द्यावा. ५. या खडड्यापासून साधारणपणे ३ ते ४ फुट अंतरावर पुन्हा १० फुट लांब, १० फुट रुंद व ३ फुट खोल दुसरा खडडा घ्यावा या खडड्याच्या तळाशी २ फुट जाडीचादगडगोट्यांचा थर भरावा.  ६. दोन्ही खड़े ४ इंची पीव्हीसी पाईपव्दारे जोडावेत. ७. ओढयातील पाण्यामधील पालापाचीळा, कचरा इ. १० x १० x ३ फुट या खडडथात स्थिरावतील आणि कण विरहीत पाणी पाईपव्दारे १० x १० x १० या फुट खडड्यातजाईल. ८. दुस-या खडड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाईपव्दारे जाऊन विहिर पुनभरणहोईल,
प्रश्न : कूपनलिका पुनर्भरणासाठी कोणते साहित्य लागते ?
उत्तर : कुपनलिका पुनर्भरणासाठी लागणारे साहित्य लोखंडी ड्रील (४-५ मीमी), काथ्या, गाळणी, धुतलेली वाळू, वाळूची चाळ, खडी आणि दगडगोटे.
प्रश्न: कुपनलिका पुनर्भरण कसे करतात?
उत्तर : कुपनलिकेन्दारे भूजल पुनर्भरणाची पध्दत खालीलप्रमाणे  १. कुपनलिके जवळ नाला अथवा ओढयाचे पाणी वळवावे. २. कूपनलिकेच्या सभोवताली २x२x२ मीटर आकाराचा खडड्ा खोदावा. ३. खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाईपच्या भागास १ २ से.मी अंतरावर सर्व ४. बाजूने ४-५ मीमी व्यासाची छिट्रे पाडावी. ५. या छिद्रावर नारळदोरी (काथ्या) घटक गुंडाळावा. ६. खडड्याचे चार भागात विभाजन करुन सर्वात खालच्या भागात दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वात वरच्या भागात खड़ी नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वात वरच्या भागात धुतल्ली वाळू भरावी. अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कुपनलिकेचे पुनर्भरण होईल.
प्रश्न : विहिर व कूपनलिका पूनर्भरणासाठी शासकीय अनुदान उपलब्ध आहे काय ?
उत्तरः विहिर व कूपनलिका पुनर्भरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शासकीय अनुदान योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेनंतर उपलब्ध होते.
प्रश्न: क्षारयुक्त पाणी विहिर पुनर्भरणास वापरावे का?
उत्तर: ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरु नये.
प्रश्न : विहिर व कुपनलिका पुनर्भरणासाठी वापरली जाणा- या गाळणीची स्वच्छता केंव्हा करावी?
उत्तर: विहीर व कुपनलिका पुनर्भरणासाठी वापरली जाणा- या गाळणीची स्वच्छता दोन  महिन्यातून एकदा करावी.
प्रश्न : साखर कारखान्याच्या परिसरात विहिर व कुपनलिका पुनर्भरण करावे का?
उत्तरः साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरल्या जाते त्या भागातील पाणी विहिर व कूपनलिका पुनर्भरणास वापरु नये.

 Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #agriculture #market #बाजारभाव #onion https://t.co/psZKfivgOS” / Twitter

Advertisement
प्रश्न : कूपनलिका पुनर्भरणासाठी वापरल्या जाणा-या गाळणी थराची जाडी कशी असावी?
उत्तर: कुपनलिका पुनर्भरणासाठी वापरल्या जाणा-या गाळणी थराची जाडी प्रामुख्यानेखालीलप्रमाणे असावी. दगडाचा थर – २.० फूट धुतलेली वाळू – १.५ फुट वाळूची चाळ – १.५ फुट खडी – १.५ फुट दगडगोटे – १.५ फुट
प्रश्नः कुपनलिकेव्दारे भूजल पुनर्भरण करण्यासाठी कुपनलिकेसभोवती घेण्यात येणा-या खडड्याचे आकारमान किती असावे?.
उत्तर : कुपनलिका पुनर्भरणासाठी कूपनलिकेच्या सभोवताली २ x २ x २ मीटर आकाराचा खडडा खोदावा.
प्रश्न : विहिर कुपनलिका पुनर्भरणाचे वेळी कोणती काळजी घ्यावी?
उत्तर १. ओढयाचे येणारे पाणी हे क्षार व रसायन विरहीत असावे. २. विहीरीत पाणी तळापर्यंत पाईपव्दारे पोहचवावे. ३. पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खडड़े असावेत. ४. पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून घ्यावा.  ५. पुनर्भरण हे गाळलेल्या स्वच्छ पाण्यानेच करावे. ६. क्षारयुक्त पाणी पुनर्भरणास वापरु नये. ७. औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पूनर्भरणास वापरु नये, साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरल्या जाते त्या भागातील पाणी वापरु नये. ८. सुक्ष्म जिवाणूजन्य तथा रोगराईस्थित क्षेत्रातील पाणी वापरु नये. ९. वाळू गोटे यांनी तयार केलेली गाळणी दोन महिन्यातुन एकदा स्वच्छ करावी.
प्रश्न : पंपिग विहिरीव्दारे भूजल पुनर्भरण कसे करतात?
उत्तर : पंपिंग विहिरीतील पाण्याच्या उपसा केल्यानंतर जलभारात कमी दाब तयार होतो व जादा दाबाखाली असलेले भुपृष्ठावरील पाणी जर हैड्रोलिकली जोडलेले असेल तर पंपिंगविहिरीव्दारे भूजल पुनर्भरण करता येते.
प्रश्नः कुपनलिकेव्दारे भूजल पुनर्भरण करताना केसिंग पाईपच्या भागास किती अंतरावर व किती मि.मी. व्यासाची छिद्रे पाडावीत ?
उत्तर: कुपनलिकेच्दारे भूजल पुनर्भरण करताना खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाईपच्या भागास १-२ सेमी अंतरावर सर्व बाजूने ४-५ मीमी व्यासाची छिद्रे पाडावीत.
प्रश्न: विहिर व कुपनलिका पुनर्भरणासाठी विशेष तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असावी लागते का?
उत्तरः विहिर कुपनलिका पुनर्भरणासाठी विशेष तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता नाही.उपलब्ध मनुष्यबळ वापरुन विहीर व कूपनलिका पुनर्भरण करता येऊ शकते.
प्रश्न: विहिर व कुपनलिका पुनर्भरणासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठात कोठे संपर्क करावा?
उत्तरः विहीर व कुपनलिका पुनर्भरणासाठी माहिती जाणून घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठात भूजल संशोधन प्रकल्प, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी येथे संपर्क करावा.
प्रश्न: विहीर व भूजल पुनर्भरणासाठी शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते का?
उत्तर: विहीर व भूजन पुनर्भरणासाठी विशेष शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मफुकृवि, राहूरीचाभूजल संशोधन प्रकल्प व महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुकास्तरीय कार्यालयामार्फत दरवर्षी करण्यात येते.
प्रश्न: बंद पडलेल्या कुपनलिकांव्दारे भूजल पुनर्भरण करता येते का?
उत्तर: कुपनलिका पुनर्भरण करण्यासाठी योग्य विंधन विहीरंची निवड करावी लागते. ज्या विंधनविहीरीला पाणी नाही ती विहीर शक्यतो भूजल पुनर्भरणासाठी टाळावी.
प्रश्न : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या भूजल पातळीची माहिती कोठे उपलब्ध होऊ शकते ?
उत्तर: जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या भूजल पातळीची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा या कार्यालयामार्फत जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते.
प्रश्न: भूजल प्रगतीकरणासाठी महाराष्ट्रात कोठे यशस्वी प्रयोग घेण्यात आला?
उत्तर: भूजल प्रगतीकरणासाठी विंधन विहीर स्फोट व हैड्रोफॅक्चरींग व्दारे आदर्शगाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर येथे यशस्वी प्रयोग घेण्यात आला आहे.

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #agriculture #market #बाजारभाव #onion #कांदा https://t.co/9KaLVqOwcH” / Twitter

Advertisement
स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply