Take a fresh look at your lifestyle.

कृषी प्रश्नोत्तरे | वाचा विहिरीव्दारे भूजल पुनर्भरणाचे महत्वाचे मुद्दे

या लेखामध्ये आपण दाबभरण विहिरीव्दारे भूजल पुनर्भरण, इन्डयुस्ड पुनर्भरण, ग्रॅव्हिटी हेड रिचार्जवेल आणि यासाठीचा खर्च आदींची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

Advertisement
प्रश्न : दाबभरण विहिरीव्दारे भूजल पुनर्भरण कसे करतात?
उत्तरः दाबभरण विहिरीला इंजेक्शन वेल असेही म्हणतात. पुनर्भरण क्षेत्रावरील पृष्ठभागावरील पाणी विधन विहिरीतुन पंपाच्या सहाय्याने अतिदाबाने खोलवर जलभारात भरवले जाते. जलभारात हे पाणी पसरते व साचते. याकरिता योग्य विंधन विहिरींची निवड करावी लागवते. ज्या विहीरीला पाणी नाही ती विंधन विहिर निवडू नये. पाणी भरविताना गाळविरहित असण्याकरीता विंधन विहिरीच्या तोंडाशी गाळण व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे जलभाराच्या स्थरात विंधन विहिरीला छिद्रांकित केसिंग पाईप पुरवावा. अमरावती विभागात मंगरुळपीर येथे अशाच प्रकारचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
प्रश्न : इन्डयुस्ड पुनर्भरण म्हणजे काय?
उत्तर: पाणीसाठा जलभारात भरविला जातो. याला इंन्डयुस्ड पुनर्भरण म्हणतात.
प्रश्न : भूजल पुनर्भरणासाठी नेमकी कोणती पध्दत वापरावी?
उत्तरः भूजल पुनर्भरणाच्या अनेक पध्दती आहेत. भूजल पुनर्भरणाची नेमकी पध्दत ही त्या परिसराच्या भौगौलिक व स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते.
प्रश्न : भूजल पुनर्भरणासाठी प्रामुख्याने कोणत्या बाबी पडताळाव्या लागतात?
उत्तर: भूजल पुनर्भरणासाठी प्रामुख्याने प्रक्षत्रातील भूजलाचा चढउतार, भूस्तर रचना, मातीचाप्रकार, पुनर्भरणासाठी पाणी, त्याचा साठा, गुणवत्ता, योजनेची तांत्रिक व आर्थिकसबलता इ. बाबी प्रामुख्याने पडताळाव्या लागलात.

(2) Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #corona #health #covid19 https://t.co/YotR55SKIb” / Twitter

Advertisement
प्रश्न : गुरुत्वाकर्षण भरण विहिर (ग्रॅव्हिटी हेड रिचार्जवेल) व्दारे भूजल पुनर्भरण कसे करतात ?
उत्तर : या भूजल पुनर्भरण पध्दतीमध्ये ओढयाचे पाणी विंधन विहिरींना पुरविले जाते. हे करताना फिल्टर व केसिंगची व्यवस्था असते. पंपाव्दारे दाबाने पाणी न भरविता गुरुत्वाकर्षनाव्दारे भरतात. पुनर्भरणाकरीता वापरणारे पाणी भारविरहित व चांगल्या दर्जाचे असावे आणि गुरुत्वाकर्षणाच्या दाबाने जमीनीत जलभारात भरविले जाते. या प्रकारात खोलवर विहिर असणे गरजेचे आहे.
प्रश्न : भूजल प्रगतीकरणाच्या दोन पध्दती कोणत्या आहेत?
उत्तरः भूजल प्रगतीकरणाच्या दोन पध्दती प्रामुख्याने १)विंधन विहिर स्फोट २)हैड्रा फॅक्चरींग प्रश्न : मातीच्या थरातुन पाणी मूरण्याचा वेग दर दिवसाला किती असतो? उत्तर: मातीच्या थरातुन पाणी मूरण्याचा वेग दर दिवसाला साधारणपणे २ सेंमी असतो. काळीमाती २ से.मी/दिवस ,मुरुम १० से.मी/दिवस ,खडकास छिद्र,भेगा असतील तर २ मी./दिवस इतका पाणी मूरण्याचा वेग असू शकतो.
प्रश्न : मुरमाच्या थरातून पाणी मूरण्याचा वेग दर दिवसाला किती असतो?
उत्तरः मुरमाच्या थरातून पाणी वाहण्याचा वेग दर दिवसाला साधारणपणे १० सेंमी असू शकतो.
प्रश्न: पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजलसाठयापर्यंत पोहचण्यास साधारणपणे किती कालावधी लागतो?
उत्तरः पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजलसाठ्यापर्यंत पोहचण्यास साधारणपणे एक ते दिड महिना किंवा जास्त कालावधी लागतो.
प्रश्न: विहिर पुनर्भरण महत्वाचे व गरजेचे का आहे?
उत्तरः विहिर पुनर्भरण महत्वाचे व गरजेचे आहे कारण पाणी उपसण्याचा सध्याचा आपला वेग हा नैसर्गिक भूजल भरणाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे.
प्रश्न : भूजल संवर्धन कशाव्दारे केले जाते?
उत्तर: भूमीगत बंधारे व खडकातील भेगा बंद करुन भुजल संवर्धन केले जाते.
प्रश्न : भूजल पुनर्भरणाच्या प्रत्यक्ष पध्दतीत कोणत्या दोन पध्दतीचा अंतर्भाव होतो?
उत्तरः भुजल पुनर्भरणाच्या प्रत्यक्ष पध्दती १. भुपृष्ठसाठा पध्दत व २. भूपुष्ठाखालील साठा पध्दत्त या दोन पध्दतींचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो.
प्रश्न : भूजल पुनर्भरणाच्या भूपृष्ठाखाली साठा पध्दती कोणत्या ?
उत्तरः भूजल पुनर्भरणाच्या भूपृष्ठाखाली साटा पध्दती प्रामुख्याने दोन आहेत. १) दाब भरण विहिर व २) गुरुत्वाकर्षण भरण विहिर
प्रश्न : विहिर पुनर्भरणासाठी साधारणतः किती खर्च येतो?
उत्तर : विहिर पुनर्भरणासाठी साधारणपणे रु.१५०० ते २००० इतका खर्च येतो.
प्रश्न: कुपनलिका पुनर्भरणासाठी साधारणत किती खर्च येतो?
उत्तर कुपनलिका पुनर्भरणासाठी साधारणपणे रु. १५०० ते २००० इतका खर्च येतो.

(2) Krushirang on Twitter: “#ahmednagar #survey #politics #अहमदनगर #सर्वेक्षण #राजकीय https://t.co/iJrezqUBxI https://t.co/3vLIxmrEGH” / Twitter

Advertisement
स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply