Take a fresh look at your lifestyle.

कृषी प्रश्नोत्तरे | नालाबंदिस्ती व पाझर तलावाव्दारे भुजलपूनर्भरण; वाचा जलसंधारणाची माहिती

या लेखामध्ये आपण नालाबंदिस्ती, पाझर तलावाव्दारे भुजलपूनर्भरण, स्ट्रिम मोडीफिकेशन, प्रवाही सिंचन पध्दत, पाणीसाठा पध्दतीव्दारे भुजल पुनर्भरण, अप्रत्यक्ष पध्दती आदींची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

Advertisement
प्रश्न : नालाबंदिस्ती म्हणजे काय ?
उत्तरः नाल्यावर ठिकठिकाणी बांध घालून पाणी आडविल्यामुळे पाणी तर आडतेच शिवायगाळयुक्त माती साचते. नाला बंदिस्ती सारख्या जलसंधारणाच्या कामामुळे पाणी आडविले जाते. पर्यायाने भुजलसाठा वाढण्यास मदत होते, यालाच नाला बंदिस्ती असे म्हणतात.
प्रश्न : पाझर तलावाव्दारे भुजलपूनर्भरण म्हणजे काय?
उत्तर: क्षेत्रातील उंच भागातील वाहणा-या नाल्यावर बांध घालून पाणी साठा केल्यानेतलावातील पाणी पाझरुन जवळच्या विहीरींना येते व पर्यायाने भूजलपूनर्भरण होण्यास मदत होते. या तलावातुन पंपाव्दारे पाण्याचा उपसा शक्यतो करत नाहीत.
प्रश्न : स्ट्रिम मोडीफिकेशन म्हणजे काय? व त्याचा भूजलपूनर्मरणासाठी कसा उपयोग करतात?
उत्तर : स्ट्रिम मोडीफिकेशन म्हणजे नदीचा काही अंशी पाट वळवून दुसरीकडे खोलगट भागात पाणी साठा करतात व त्याव्दारे नविन क्षेत्रावर पाणी उपलब्ध केले जाते व पर्यायाने भूजलपूनर्भरणास मदत होते. यालाच स्ट्रिम मोडीफिकेशन असे म्हणतात.

(2) Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #business #poultry #egg #ahmednagar #parner #pune https://t.co/DNm1aKHRJb” / Twitter

Advertisement
प्रश्न : भूजल पुनर्भरणासाठी वापरली जाणारी प्रवाही सिंचन पध्दत म्हणज काय ?
उत्तर: या पध्दतीमध्ये पाणी शेतावर पसरविले जाते. ही फार पुरातन पध्दत आहे. भात खाचरामध्ये पाणीसाठा करतात त्यामुळे भुजल पुनर्भरणात मदत होते. इतर पिकासाठी ही पध्दत वाप नाहीत. पाणी जमिनीवर रानबांधणी न करताच, पसरविले जाते याला प्रवाही सिंचन पध्दत म्हटले जाते.
प्रश्न : भुपृष्ठाखाली पाणीसाठा पध्दतीव्दारे भुजल पुनर्भरण कसे करतात?
उत्तर: जमिनीच्या आत काही उपाययोजना करुन पाणीसाठा करता येतो. भुपृष्ठावर साठा केला तर बाष्पीभवन होते. तसेच जमिनी खराब होऊ शकतात. जमिनीखाली पाणी साठा केला तर भुजल पातळी खुप वाढते पण या पध्दती ठराविक परिस्थीतीतच वापरता येऊशकतात. वरील सर्व उपायाव्दारे भूजल पुनर्भरणास मदत होते.
प्रश्न : भुजल पुनर्भरणासाठी वापरली जाणारी अप्रत्यक्ष पध्दती म्हणजे काय ?
उत्तरः पाणी प्रत्यक्षपणे न भरता पुनर्भरणाचा वेग वाढविण्याचे उपाय या प्रकारात मोडतात. जमिनीतील पाण्याचा उपसा केल्याने भूजलपातळी खालावते व त्या विहीरीच्या क्षेत्रातील जलदाब कमी होतो व जादा जलदाबाकडुन पाणी कमी जलदाबाकडे वाहते. यालाचभूजल पुनर्भरणाची अप्रत्यक्ष पध्दत म्हणतात.

(2) Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #business #investments #scheme https://t.co/MboBeTanAj” / Twitter

Advertisement
स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply