Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : सनरायझर्सला मोठा झटका; म्हणून कोच मुरलीधरन रुग्णालयात दाखल

मुंबई :

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांना चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांची अँजिओप्लास्टी केल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच मुरलीला हॉर्टशी संबंधित काही समस्या आल्या,  त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या हृदयात एक ब्लॉकेज असल्याचे समजते. त्यानंतर त्याच्या हृदयात एक स्टेंट घातला गेला. मुरलीधरन १७  एप्रिल रोजी हैदराबादच्या सामन्यावेळी टीमसमवेत उपस्थित होता. त्यानंतर रविवारी सायंकाळी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  सध्या तो ठीक आहे आणि लवकरच स्कॉडमध्ये सामील होईल.

Advertisement

श्रीलंकेचा ४९ वर्षीय मुरलीधरन हा जगातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने १३३  कसोटी, ३५० एकदिवसीय आणि १२  टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. त्याने कसोटी सामन्यात ८००, एकदिवसीय सामन्यात ५३४  आणि टी २०  मध्ये १३  बळी घेतले आहेत. १९९६ मध्ये श्रीलंकेने एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला तेव्हा तो संघाचा भाग होता. २०११ मध्ये वर्ल्ड कपनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Advertisement

 आयपीएलच्या १४  व्या सत्रात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादला अपेक्षित अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी आतापर्यंत आपले तीनही सामने गमावले आहेत. त्यामुळे ते पॉइंट्स टेबलच्या तळाशी आहेत. अशा परिस्थितीत गोलंदाजी प्रशिक्षकाची अनुपस्थिती संघाला अडचणीत आणू शकते. सनरायझर्सचा प्रशिक्षक होण्यापूर्वी मुरलीधरन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज,  कोची टस्कर्स केरळ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ६६  सामने खेळले आहेत.

Advertisement

 संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply