Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : रोहितचे शूज ठरताय आकर्षणाचे केंद्रबिंदू; सलग तिसऱ्या सामन्यात दिला संदेश

मुंबई :

Advertisement

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात एक खास संदेश देत आहे. शनिवारी रात्री चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात तो पुन्हा आपल्या खास शूजमध्ये दिसला. यावेळी त्याने प्रवाळांना वाचवण्याचे आवाहन केले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात रोहित आपल्या शूजवर एक सुंदर कलाकृती असलेल्या सागरी जीवनाविषयी जागरूकता निर्माण करताना दिसला,  त्याआधी त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात गेंडा आणि केकेआरसमवेत दुसर्‍या सामन्यात प्लास्टिकमुक्त समुद्राचा संदेश दिला होता.

Advertisement

 खरं तर,  कोरल तथा प्रवाळ समुद्र तळाशी आढळणारा एक प्राणी आहे. वन्य प्राणी, सागरी प्राणी आणि त्यांच्यापासून बनवलेल्या वस्तूची तस्करी केली जाते. हे वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत बेकायदेशीर आहे आणि वन्यजीव कायद्यान्वये प्रतिबंधित आहे. ऑक्टोपस,  स्टारफिश आणि माश्यांचे घर असलेल्या समुद्राच्या तळाशी जवळपास पाच हजार प्रजाती आढळतात.

Advertisement

दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली यंदाही संघ चांगली कामगिरी करत असून मुंबईच्या गोलंदाजांनी या मोसमात दाखवून दिले की,  १५० धावांचे लक्ष्य जरी प्रतिस्पर्धी संघाला दिले तरी ते सामना जिंकू शकतात.  शनिवारी मुंबईने सनरायझर्स हैदराबादला १३  धावांनी पराभूत केले. हैदराबादला १५१  धावांचे लक्ष्य होते आणि त्यांचा संघ १३७  धावांवर बाद झाला. फिरकीपटू राहुल चहरने आणि ट्रेंट बाउल्टने तीन गडी बाद केले. बुमराहला एक विकेट मिळाली,  परंतु त्याने चार षटकांत केवळ १४  धावा दिल्या.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply