Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : सिराजच्या ‘त्या’ षटकाने जिंकली रसिकांची मने; पहा विराटने काय दाद दिलीय त्याला..!

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले गेले आहेत. या ११ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) एकमेव असा संघ आहे ज्याने अद्याप एकाही सामन्यात पराभवाची चव चाखली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या या संघाने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरुद्ध सामने जिंकले आहेत. या हंगामात आरसीबीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली आहे. रविवारी रविवारी (१८ एप्रिल) केकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने ३८ धावांनी विजय मिळविला. आंद्रे रसेल  क्रीजवर होता आणि त्याने १७ व्या, १८ व्या षटकात २० व १५ धावा केल्या. विराटने १९ व्या षटकात चेंडू सिराजकडे दिला आणि तेव्हा रसेल स्ट्राईकवर होता.

Advertisement

केकेआरचा विजय यावेळी खडतर दिसत होता, पण रसेल क्रीजवर होता, त्यामुळे आरसीबीचे चाहतेही खूप तणावग्रस्त होते. १९ व्या षटकात सिराजने केवळ एक धाव दिली. त्याने रसेलला पहिल्या पाच चेंडूंमध्ये एकही धाव करण्याची संधी दिली नाही. सामन्यानंतर विराटने सिराजच्या त्या षटकाचा उल्लेख केला आणि म्हणाला, सिराजचे ते षटक खास होते, कारण बॅटींगला रसेल होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सिराज वेगळा गोलंदाज झाला आहे आणि आज त्याने सामना जिंकुन दिला.

Advertisement

शेवटच्या दोन षटकांत केकेआरला ४४ धावा करायच्या होत्या. पण रसेल क्रीजवर होता म्हणून ते अशक्य वाटत नव्हते. सिराजने १९ व्या षटकात एकच धावा दिली आणि अशा प्रकारे केकेआरला अखेरच्या षटकात ४३ धावांचे अशक्य असे लक्ष्य मिळाले. सोशल मीडियावरही सिराजचे कौतुक होत आहे. रसेलला ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली ते पाहून सिराजने प्रत्येकाचे मन जिंकले. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply