Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून आरसीबी यंदा जिंकू शकते खिताब; पहा काय केले वॉनने ट्विट

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आतापर्यंतचा प्रवास खूपच प्रभावी आणि रमणीय ठरत आहे. या संघाने आतापर्यंत त्यांचे तिनही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात आरसीबीने पाच वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सचा पराभव केला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी ट्विट करुन आरसीबीचे कौतुक केले. त्यांनी आरसीबीला गेल्या कित्येक वर्षातील सर्वात संतुलित संघ म्हणून वर्णन केले आणि सांगितले की, यावेळी कदाचित ते आयपीएलचा खिताब पटकावू शकतील.

Advertisement

वॉनने ट्वीट करून लिहिले की, गेल्या अनेक वर्षांत हा आरसीबीचा सर्वात संतुलित संघ आहे. या वर्षी हे होऊ शकते? बाद फेरीत ते मुंबई इंडियन्सचा पराभव करु शकतील. सन २०२० मध्ये विराट कोहलीचा संघ प्लेऑफमध्ये बाद झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या हंगामात त्यांच्या तिसऱ्या सामन्यात बलाढय कोलकाता नाईट रायडर्सला ३८ धावांनी पराभूत केलं आहे.

Advertisement

Michael Vaughan on Twitter: “This is best balanced @RCBTweets for many many years …. Could this be the year !!!! Only if they beat @mipaltan in the knockouts !!!! #DoubtIt #IPL2021” / Twitter

Advertisement

आरसीबीकडून मॅक्सवेलने ४९ चेंडूत ९ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ७८ धावा फटकावल्या. मॅक्सवेलने २८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. एबी डिव्हिलियर्स ३४ चेंडूत ७६ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला होता, यामुळे ते ३८ धावांनी जिंकु शकले. दरम्यान, वॉनने केलेल्या टीवट्मुळे आरसीबीच्या लाखो चाहत्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply