Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : मॅक्सवेलच्या तुफानी खेळीनंतर सेहवागने पंजाब संघाला असे केले ट्रोल..!

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा ३८ धावांनी पराभव केला असून ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा आरसीबीकडून चांगली फलंदाजी केली आहे. मॅक्सवेलच्या खेळीनंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर एक मिम्स शेअर केला आहे. त्याने या मिम्सद्वारे पंजाब संघाला ट्रोल केले आहे. गेल्या वर्षी खराब कामगिरीनंतर पंजाब संघाने मॅक्सवेलला नारळ दिला होता.

Advertisement

वीरेंद्र सेहवागने ट्वीट करून ल्युडो या बॉलिवूड चित्रपटाचा एक सीन शेअर केला आहे. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, या आयपीएलमध्ये मॅक्सवेलला आपल्या क्षमतेनुसार खेळताना पाहणे चांगले आहे. दरम्यान त्याच्या आधीच्या टीमकडून पंजाबकडून मॅक्सवेलने आयपीएल २०२० मध्ये १३ सामन्यांत फक्त १०८ धावा केल्या. महत्त्वाचे म्हणजे या मोसमात आतापर्यंत मॅक्सवेलने दोन अर्धशतक ठोकले आहे. ग्लेन मॅक्सवेलने हैदराबादविरुद्ध ४१ चेंडून ५९ धावा केल्या होत्या.

Advertisement

Virender Sehwag on Twitter: “Good to see Maxwell finally play to his potential in this IPL. Meanwhile Maxwell to his previous team owners. #RCBvKKR https://t.co/StBnPIZrMg” / Twitter

Advertisement

केकेआरविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने ४९ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांसह ७८ धावा फटकावल्या. मॅक्सवेलने २८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. एबी डिव्हिलियर्स ३४ चेंडूत ७६ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २०४ धावा केल्या. केकेआरने हा सामना ३८ धावांनी गमावला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply