Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : मॅक्सवेल व डिव्हिलियर्सने रचला ‘तो’ अनोखा विक्रम; आयपीएलच्या इतिहासात प्रथमच..!

मुंबई :
चेन्नईच्या एम चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सच्या जोडीने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सच्या वादळात केकेआर गोलंदाजांना लयच सापडली नाही. आणि आरसीबीने २० षटकांत ४ गडी गमावून २०४ धावा केल्या. मॅक्सवेलने ४९ चेंडूत ७८ धावा केल्या, त्यानंतर डिव्हिलियर्सने त्याच्यापुढे एक पाऊल टाकले आणि केवळ ३४ चेंडूत ७४ धावा कुटल्या. या दोन्ही फलंदाजांनी आयपीएलमध्ये एक विक्रमही केला आहे.

Advertisement

Bharath Seervi on Twitter: “Glenn Maxwell 78 (49) AB de Villiers 76* (34) First time the No.4 and No. 5 batsmen of a team have scored 75+ in the same innings in IPL history. #RCB #IPL2021 #RCBvKKR” / Twitter

Advertisement

आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा दोन्ही फलंदाजांनी एकाच डावात ७५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. मॅक्सवेलने ४९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७८ धावा फटकावल्या, तर एबीडीने आपल्या वादळी खेळीत ९ चौकार आणि ३ षटकार ठोकले. मॅक्सवेलने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पदिक्काल बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या डिव्हिलियर्सने मॅक्सवेलला दमदार साथ दिली आणि दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली.

Advertisement

मॅक्सवेल बाद झाल्यानंतर एबी डिव्हिलियर्सने आपले रौद्ररुप दाखवत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. डिव्हिलियर्सने ३४ चेंडूत ७६ धावांची तुफानी खेळी केली आणि तो नाबाद राहिला. मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सच्या खेळीमुळे बंगळुरू संघाने स्कोअरबोर्डवर २०४ धावांची नोंद केली आणि केकेआरला ३८ धावांनी पराभूत केले. या सामन्यात बेंगळुरूची टीम अवघ्या तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरली होती. अष्टपैलू डॅन ख्रिश्चनच्या जागी संघाने रजत पाटीदार याची टीममध्ये निवड केली होती.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply