Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून दिल्लीच्या शिखर धवनकडे आला ऑरेंज कॅप..!

मुंबई :

Advertisement

पंजाब किंग्जने दिलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटला सलामीवीर शिखर धवनमुळे जास्त संघर्ष करावा लागला नाही. धवनने ९२ धावांची तडाखेबंद खेळी केली, ज्यामुळे तो यंदाच्या मोसमात तीन सामन्यात १६६ धावा करुन ऑरेंज कॅपधारक बनला आहे. पंजाबविरूद्ध सामना जिंकल्यानंतर सामनावीर ठरलेला शिखर धवन म्हणाला की, मी माझ्या बाजूने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मला माहित आहे की, बरेच लोक माझ्या स्ट्राइक रेटवर बोलतात. मी हेही मान्य करतो कि त्यात सुधारणा करावी लागेल. त्यासाठी मी बरेच कष्ट घेतले आहेत.

Advertisement

धवन पुढे म्हणाला की, मी आता अधिक जोखीम घेण्यास सुरुवात केली आहे. बदलांची कधीही भीती बाळगू नका. नेहमी त्या दिशेने जायला हवे. मी फक्त काही शॉट्सवर काम केले. माझा स्लॉग शॉट खूप सुधारला आहे. तो आधी चांगला होता परंतु आता मी अधिक मोकळेपणाने खेळत आहे. पृथ्वीने आज प्रभावी सुरुवात केली होती. आज त्याने ज्या पद्धतीने खेळ केला ते पाहून आनंद झाला. त्याची फलंदाजी पाहून मीही मोकळेपणाने शॉट खेळू लागलो.

Advertisement

दरम्यान, धवन या सामन्यात ९२ धावांवर बाद झाल्याने तो पुन्हा नर्वस ९० चा शिकार ठरला आहे. आय.पी.एल. इतिहासामध्ये आतापर्यंत तो  ६ वेळा नर्वस ९० चा बळी ठरला आहे.  त्याच्यापुढे विराट कोहलीचा नंबर आहे जो आतापर्यंत ९ वेळा ९०+ धावा करून बाद झाला आणि शतकी खेळीला मुकला आहे. धवनने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्यापुढे सुरेश रैना आणि विराट कोहली आहेत.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply