Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून राशीद खानसोबत डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसनने धरला रोजा

मुंबई :
यंदा रमजानच्या पाक महिन्याच्या वेळी आयपीएलचे आयोजन केले जात आहे. खेळाडू उपवास धरण्याबरोबर खेळत आहेत. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाने सांघिक एकता दर्शवण्याचे चांगले उदाहरण समोर ठेवले आहे. राशिद खानने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे आणि अशी माहिती दिली आहे की, संघातील मुस्लिम खेळाडूंचे समर्थन करण्यासाठी संघातील स्टार खेळाडूदेखील उपवास करीत आहेत. ज्यामध्ये संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कीवी स्टार खेळाडू केन विल्यमसनही सहभागी आहेत.

Advertisement

सनरायझर्स संघात राशिद व्यतिरिक्त मोहम्मद नबी, मुजीब फर रहमान आणि खलील अहमद यांनी रोजे धरले असून रविवारी हा संघ कोणताही सामना खेळणार नव्हता, म्हणून विल्यमसन आणि वॉर्नरनेही आपल्या सहकारी खेळाडूंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राशिदने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो केन आणि वॉर्नरसोबत टेबलवर बसलेला दिसत आहे.

Advertisement
View this post on Instagram

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

Advertisement

जेव्हा त्याने वॉर्नरला रोजाबद्दल विचारले तेव्हा कर्णधाराने उत्तर दिले की, रोजा खूप चांगली गोष्ट आहे पण ती खूप कठीण आहे. मला खूप तहान आणि भूक लागली आहे. विल्यमसन म्हणाला की, त्याला रोजा धरताना चांगले वाटत आहे. यानंतर राशिदने चाहत्यांना सांगितले की, वॉर्नर आणि विल्यमसन यांनीही त्याच्याबरोबर उपवास धरला आहे आणि त्यांना याबद्दल खूप आनंद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहते दोन्ही परदेशी खेळाडूंचे जोरदार कौतुक करीत आहेत.  
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply