Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून ‘केकेआर’च्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता; प्रशिक्षक मॅकलमने दिले संकेत

मुंबई :
कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम याने रविवारी सांगितले की, मुंबईत होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या आगामी सामन्यांसाठी त्याच्या संघात काही बदल केले जातील. संघ आणि कार्यक्रमातील बदलांमुळे त्यांची मोहीम पुन्हा रुळावर येईल अशी आशा त्याने व्यक्त केली. रविवारी आरसीबीविरुद्ध केकेआरला ३८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या हंगामातील त्यांचा हा सलग दुसरा पराभव आहे.

Advertisement

मॅकलम म्हणाला की, आम्हाला फ्रेश खेळाडू हवे आहेत. त्यामुळे संघात थोडा बदल होईल. मुंबईतील सामन्यांमुळे कार्यक्रमस्थळ ही बदलले जाणार आहे. केकेआरने चेन्नईत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना शेवटच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार म्हणाला, आम्ही आता नवीन ठिकाणी सामने खेळणार आहोत, आम्हाला काही ठिकाणी सुधारणा करावी लागेल. पुढील दोन सामन्यात आम्ही चांगले पुनरागमन करू शकतो, असेही तो म्हणाला.

Advertisement

दरम्यान, आरसीबीविरुध्द पहिल्याच षटकात वरुण चक्रवर्तीने दोन गडी बाद केले होते. पण केकेआरचा कर्णधार इयोन मॉर्गनने त्याच्याकडे चेंडू पुन्हा न देता दुसऱ्याकडे दिला. यावर मॅकलम यानेही टीका केली. मॅकलम म्हणाला की, त्यावेळी चक्रवर्तीला गोलंदाजी न देणे ही एक चूक होती. आम्हाला त्याचा उपयोग एबी डिव्हिलियर्सविरूद्ध करायचा होता, पण आमची योजना कार्यान्वित झाली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चार बाद २०४ धावा केल्या तर केकेआरचा डाव ८ गडी राखून १६६ धावांवर संपुष्टात आला.  
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply