Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : आणि वाढदिवसाला नाहीच मिळाले गिफ्ट; १९५ धावा करूनही पंजाब किंग्ज झाला पराभूत

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये काल रविवारी (१८ एप्रिल) दोन सामने खेळले गेले. दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटलने सहा गडी राखून पराभूत केले. पंजाबने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत चार गडी गमावून १९५ धावांचे मोठे आव्हान दिल्लीपुढे ठेवले. पण दिल्ली कॅपिटलने अवघ्या १८.२ षटकांत चार गडी गमावून हा सामना जिंकला. सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार के.एल. राहुल म्हणाला की, १९५ हे चांगले टारगेट होते, पण आम्ही तरीही पराभूत झालो.

Advertisement

मयंक अग्रवाल (३६ चेंडूत ६९ धावा, सात चौकार, चार षटकार) आणि राहुल (५१ चेंडूत ६१ धावा, सात चौकार, दोन षटकार) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचत २० षटकात चार विकेट गमावून १९५ धावा केल्या. दिल्ली संघाने सलामीवीर शिखर धवनच्या (९२) तुफानी अर्धशतकासह १८.२ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा फटकावून सहजरित्या विजयाची नोंद केली. मार्कस स्टोनिस (१३ चेंडून २७ धावा, तीन चौकार, एक षटकार) आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (३२ धावा) यांनीही उत्कृष्ट खेळी खेळली. धवनने ४९ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि दोन षटकार ठोकले.

Advertisement

राहुल सामन्यानंतर म्हणाला, फलंदाजी करताना असे वाटत होते की, १९६ हे चांगले टारगेट होते. शेवटी, जर तुम्ही त्याकडे पाहिले तर असे दिसते की आम्ही १० ते १५ धावा कमी केल्या. मयंक आणि मी पहिल्या हाफमध्ये विचार करत होतो की जर आपण १८० ते १९० धावा केल्या तर ती चांगली धावसंख्या असेल. पण अर्थातच वानखेडे स्टेडियममध्ये सेकंड हाफमध्ये येणारे दव आणि धवन यांच्यापुढे आम्ही काहीच करु शकलो नाही.

Advertisement

तो म्हणाला, दवामुळे गोष्टी कठीण होतात. वानखेडेमध्ये सेकंड हाफमध्ये गोलंदाजी करणे नेहमीच एक आव्हान असते. आम्ही नेहमी या प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार राहण्याचा प्रयत्न करतो पण आमच्यापुढे परिस्थिती कठीण होत जाते. वाढदिवसाच्या दिवशी राहुलच्या संघाला सामना गमवावा लागला याचे इतर खेळाडूंना वाईट वाटले. ते राहुलला विजयाच्या माध्यमातून बर्थ डे गिफ्ट देण्यासाठी प्रयत्नशील होते.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply