Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : अर्र.. आणि गावस्करांची कॉमेंट्री ऐकल्यानंतर बेन स्टोक्सने लावला डोक्यालाच हात..!

मुंबई :
राजस्थान रॉयल्सला यंदा आयपीएल मोसमाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला असून स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स जखमी झाला आहे आणि त्याला आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाहीये. दरम्यान, आयपीएलच्या सामन्यात सुनील गावस्कर यांच्या कॉमेंट्रीवरून स्टोक्सने एक इमोजी ट्वीट केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement

स्टोक्स याने गावस्कर यांचे नाव न घेता त्यांनी कॉमेंट्री करताना केलेल्या भाष्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत असून स्टोक्सने आपल्या कपाळाला हात मारतानाचा इमोजी ट्विट केला आहे. रविवारी पंजाब आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबकडून डावाचे ११ वे षटक कागिसो रबाडाने टाकले. रबाडाच्या या षटकात पंजाबचा सलामीवीर मयंक अग्रवालने दोन षटकार लगावले. यानंतर रबाडाने केएल राहुलला बाऊन्सर फेकला. यानंतर गावस्कर यांनी यावर भाष्य केले आणि म्हणाले, काय वाईट बाउन्सर आहे. जर बाउन्सर टाकायचा असेल तर तो ऑफ स्टंपच्या वर असावा. मात्र, जेव्हा या चेंडूचा रिप्ले पाहिला गेला तेव्हा चेंडू ऑफ स्टंपच्या अगदी वर होता. यानंतर बेन स्टोक्सने एका ट्विटमध्ये कपाळावर हात ठेवून इमोजी पोस्ट केला आहे.

Advertisement

Ben Stokes on Twitter: “Commentator: “Such a poor bouncer,if you want to bowl a bouncer it must be over Off Stump” REPLAY: bouncer line directly over Off Stump Me: 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️” / Twitter

Advertisement

बेन स्टोक्सला पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती आणि त्यानंतर संपूर्ण आयपीएलमधून त्याला बाहेर पडावे लागले. वास्तविक पंजाबविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने हवेत शॉट खेळला. तो झेल पकडण्यासाठी बेन स्टोक्सने डाईव्ह लगावला. स्टोक्सने तो झेल घेतला होता, परंतु त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती आणि हे नंतर उघड झाले की स्टोक्सच्या हाताला फ्रॅक्च र आहे. आता त्याला १२ आठवडे खेळापासून दूर रहावे लागणार आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply