Take a fresh look at your lifestyle.

अशा पद्धतीने विकत घेऊ शकता करोना लस; पहा काय आहे परदेशी लसबाबतचे धोरण व प्रोसिजर

पुणे :

Advertisement

केंद्र सरकारने 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या कालावधीत 18 वर्षांवरील सर्व लोक लसीकरण करण्यसाठी पात्र असतील. देशातील कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या संकटात सरकारने लसीकरणांना वेग देण्यासाठी आता खुल्या बाजारातही करोना लस विक्रीस मान्यता दिली आहे. त्याबाबतच्या किंमतींचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच राज्य सरकारांनाही खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

Advertisement

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरले की, लस उत्पादक आता पूर्वनिर्धारित किंमतीत व खुल्या बाजारात 50 टक्के पुरवठा राज्य सरकारांना करू शकतील. बऱ्याच राज्यांमध्ये अधिकच्या लस मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना ही खरेदीची परवानगी दिली आहे. सरकारने कोरोना लसीकरणाची वयोमर्यादा 45 वरून 18 केली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, लस उत्पादकांना पारदर्शक पद्धतीने यासाठीची किंमत जाहीर करावी लागेल.

Advertisement

राज्य सरकारला आणि खुल्या बाजारात कोणत्या किंमतीवर उपलब्ध होईल, याची माहिती कंपन्यांना अगोदरच द्यावी लागणार आहे. या किंमतीच्या आधारे, राज्य सरकारे, खाजगी रुग्णालये आणि औद्योगिक संस्था उत्पादकांकडून कोरोना लस खरेदी करण्याचा निर्णय घेतील. खाजगी लस देणार्‍यांनी लसीसाठी किती शुल्क आकारले पाहिजे ते जाहीर करणे आवश्यक आहे. केवळ 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयस्कर व्यक्तींना ही लस खासगी केंद्तांतून मिळेल.

Advertisement

केंद्राने असेही म्हटले आहे की, सरकारची लसीकरण मोहीम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे आणि सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर पूर्वीप्रमाणे मोफत लसीकरण केले जाईल. सर्व लस राष्ट्रीय लसीकरणाचा एक भाग असतील आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. कोरोना लसीकरणासाठी कोव्हिन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल. सर्व लसीकरण केंद्रांनी स्टॉक व किंमतीची माहिती पुरविली पाहिजे. सरकारने हे स्पष्ट केले आहे की 50-50 टक्के सूत्र भारतात तयार होणार्‍या सर्व लसींवर लागू असेल. तथापि, परदेशातून आयात केलेल्या ‘रेडी टु यूज’ लस फ़क़्त खासगी केंद्रामध्येच मिळतील. परदेशी कंपन्या आपली लस खुल्या बाजारात थेट लस विकू शकणार असल्याने आता परदेशी लस घेण्याची मुभा नागरिकांना असेल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply