Take a fresh look at your lifestyle.

करोना काळात घरात रहाच पण ‘हेही’ टाळा; कारण ‘या’मुळे वाढतोय संक्रमणाचा धोका

पुणे :

Advertisement

सध्या करोना कालावधीत ‘घरात रहा, सुरक्षित रहा..’ हा एक मूलमंत्र बनला आहे. मागील दीड वर्षे जगभरात याचाच जप सुरू होता. मात्र, आता संशोधनातून स्पष्ट झालेले आहे की, फ़क़्त घरात राहायचे नाही, तर घरात असतानाही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण, हवेतून पसरणारा करोना व्हायरस आणखी वेगाने फैलावत आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी घरामध्येही काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

सुप्रसिद्ध सायन्स जर्नल लेसेंटच्या (Medical journal Lancet) तज्ज्ञ चमूने सांगितले आहे की, आता डब्ल्यूएचओ/ WHO (जागतिक आरोग्य संघटना) आणि इतर सार्वजनिक आरोग्य संस्थांनी या संक्रमण कालावधीत गंभीरपणे काळजी घेण्याची आणि व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटलेले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या पथकाने संशोधनाचा आढावा घेतला आणि हवेद्वारे करोना विषाणू पसरल्याचा दावा आणखी बळकट केला आहे. या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना विषाणू मोठ्या थेंबांद्वारे पसरला आहे याचा कोणताही पुरावा नाही. उलट व्हायरस हवेच्या माध्यमातून वेगाने पसरतो आहे.

Advertisement

भारतात सध्या दररोज 2 लाखाहून अधिक नवीन करोना रुग्ण सापडत आहेत. आता हा विषाणू देखील हवेत विरघळला असल्याचे दिसते. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे की व्हायरसचे बहुतेक प्रसारण हवेद्वारे (एरोसोल) होते. अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थाचे (AIIMS / All-India Institute of Medical Sciences) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नवीन संशोधनाचा निष्कर्ष पाहून घरात क्रॉस वेंटिलेशनच्या (Good cross ventilation) गरजेवर भर दिला आहे. त्यांनी याबाबतचे काही मुद्दे सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे :

Advertisement
  1. हा विषाणू बाहेर नाही तर घरामध्ये जास्त पसरणारा आहे. म्हणून हे टाळण्यासाठी उन्हाळ्यात आपल्या घराच्या सर्व खिडक्या उघडण्याची आणि चांगले क्रॉस वेंटिलेशन करणे आवश्यक आहे.
  2. कोविड कालावधीत आपण अधिक लोकांनी खोलीत जमू नये. तसेच जास्त वेळ बंद खोलीत बसू नये. कारण जर बंद खोलीत राहणाऱ्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकण्यामुळे इतरांनाही संसर्ग होऊ शकतो.
  • एखादी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीपासून 10 मीटर अंतरावर बसली असेल तर त्यांना संसर्ग होणार नाहीच असेही नाही. हे विषाणू हवेमार्फत लांबून प्रवास करू शकतात.
  • एरोसोल संसर्ग हा थेंबांच्या संक्रमणापेक्षा अगदी भिन्न आहे. थेंब हे 5 मिमीपेक्षा मोठे कण असतात आणि फार दूर प्रवास करू शकत नाहीत. बहुतेक दोन मीटरपर्यंत जाऊ शकतात आणि नंतर जमिनीवर पडतात. परंतु, एरोसोल संसर्ग त्यापेक्षाही जास्त लांब जातो.
  • खोकला किंवा शिंका यामार्फत कोरोना पसरत आहे. जगभरात कोरोनाचा प्रसार होण्याचे हे मुख्य कारण आहे. हवेद्वारे विषाणूचा फैलाव लक्षात घेऊन संरक्षण रणनीती बनविणे आवश्यक आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply