Take a fresh look at your lifestyle.

म्हणून नवाब मालिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; भाजपने दिले राज्यपालांना निवेदन

मुंबई :

Advertisement

राज्यातील करोना पोलिटिक्स आता शमण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट त्याचा भडका उडत आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी रेमिडीसिवीर औषधाबाबत केलेल्या आरोपामुळे सध्या राजकारणाला गती आलेली आहे. अशावेळी भाजपने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा असे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे.

Advertisement

याबाबत ट्विटरवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत परील यांनी म्हटले आहे की, नवाब मलिक यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ! राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना कोणीही राजकारण करू नये, असे सल्ले देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच सरकारमधील मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांनी शनिवारी केंद्र सरकारवर अतिशय बेजबाबदार आणि तथ्यहीन आरोप केले. त्यामुळेच नवाब मलिक यांच्या या अपराधाबद्दल राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जी यांनी मंत्री नवाब मलिक यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा !

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, मुळात कोरोनासारख्या महामारीशी लढण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि त्यांचे सरकार वेळोवेळी महाराष्ट्राला योग्य ती मदत करत आहेत. परंतु, केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर… बिनबुडाचे आरोप करत केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या या भीषण संकटात नवाब मलिक यांच्या या तथ्यहीन आरोपांमुळे अफवांना वाव मिळून जनतेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच नवाब मलिक हे अद्यापही या आरोपावर कोणताही पुरावा सादर करू शकले नाही.

Advertisement

त्यावर आता प्रतिक्रिया आणि प्रतिसाद सुरू झालेले आहेत. अभिषेक पवार यांनी लिहिले आहे की, दादा तुम्ही राजीनामा द्या, म्हणून सांगायची गरज नाही ; जनतेला चांगलंच माहीत आहे की,कोण राजकारण करतंय आणि कोणाला जनतेची खरोखर काळजी आहे. जनता संकटात असताना नीच आणि खालच्या पातळीचे राजकारण ज्यांनी केले आहे त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही… यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणती प्रतिक्रिया देतो, यकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply