Take a fresh look at your lifestyle.

‘डॉमिनोज’वर हॅकर्सचा हल्ला; पहा किती क्रेडिट कार्डची माहिती झालीय ‘लीक’..!

पुणे :

Advertisement

‘पिज्जा’चे नाव जरी घेतले, तरी जिभेला पाणी सुटते. त्यातही तो डॉमिनोजचा (domino’s pizza) असेल तर मग विचारायलाच नको. अनेक जण बऱ्याचदा घरबसल्या मोबाईलवरून (mobile application) ‘ऑर्डर’ करतात. त्यातही ‘डॉमिनोज’ म्हणजे शिस्तीचे दुसरे नाव. अगदी वेळेवर डिलेव्हरी बॉय (delivery boys) पिज्जा घेऊन तुमच्या दारात उभा असतो. मात्र, या ‘डॉमिनोज पिज्जा’लाच हॅकर्सनी लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे अनेकांच्या क्रेडिट कार्डची (credit cards) माहिती लीक झाली असून, ‘डॉमिनोज पिज्जा’चे धाबे दणाणले आहे..

Advertisement

दिवसेंदिवस भारतीय कंपन्यांवर सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. हॅकर्सनी (hackers) आतापर्यंत अनेकांना आपले लक्ष्य केले असून, या सायबर हल्ल्यामुळे (cyber crime) अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यात आता आणखी एक प्रसिद्ध कंपनी सापडली आहे. डॉमिनोज पिज्जा इंडिया कंपनीला हॅकर्सनी जाळ्यात ओढले आहे.
डॉमिनोज पिज्जा इंडियावर हॅकर्सने सायबर हल्ला केला असून, तब्बल १० लाख क्रेडिट कार्ड्सचे डिटेल्स ‘हॅक’ केले आहेत. डॉमिनोज पिज्जावर ऑनलाईन शॉपिंग (online shopping) केलेल्या लोकांचा (customer data) ‘पर्सनल डेटा’ लीक करण्यात आला आहे.

Advertisement

सायबर सिक्युरिटी रिसर्चच्या माहितीनुसार, हॅकर्सने १० लाख लोकांचे क्रेडिट कार्ड डिटेल्स ‘डार्क वेब’वर ४ कोटी रुपयांना विकले आहेत. हॅकर्सने हॅक केलेल्या डेटाची साइज जवळपास 13 TB इतकी आहे.
अॅलन गल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. ते ट्विटमध्ये असे म्हणतात, की डॉमिनोज पिज्जा इंडियाच्या १८०,०००,००० लाख युजर्सचे फोन नंबर (phone numbers), ई-मेल एड्रेस (e mail), पेमेंट डिटेल्स (payment details) आणि १० लाख क्रेडिक कार्डचा डेटा हॅकर्सने लीक केला आहे. अॅलन गलच्या या ट्विटवर (twitter) अद्याप डॉमिनोज पिज्जा इंडियाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. या डेटाबेससाठी एक सर्च पोर्टल तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

इंडिपेंडेंट साइबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी ‘आयएएनएस’ (IANS)ला सांगितलेल्या माहितीनुसार, राजशेखर यांनी याआधी या गोष्टीची कल्पना दिली होती. त्याचप्रमाणे CERT- in या एजन्सीला ५ मार्च रोजी याविषयी सांगितले देखिल होते. हॅकर्सकडे २०० मिलियन लोकांचे पर्सनल आणि ऑर्डर डिटेल्स होते. याबद्दलही त्यांनी आधीच सांगितले होते. याआधीही भारतातील बिग बास्केट (big basket), बाय युनिकॉन , जूस-पे, अप-स्टोक्स कंपन्यांचा डेटाही असाच प्रकारे हॅकर्सने ‘लीक’ केला होता.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply