Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर सर्वेक्षण : नगरसेवकांबाबत आहे ‘इतकी’ नाराजी; पहा कोणत्या शहरात कशी आहे भावना

अहमदनगर :

Advertisement

‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण 2021’ला नगर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभत आहे. अनेकांनी सर्वेक्षण अर्ज भरण्याची पुन्हा संधी देण्याची मागणी केली आहे. मात्र, ते आता शक्य नाही. अशा मंडळींना पुढील सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीची संधी खुली असेलच. मात्र, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील नागरिकांची लोकप्रतिनिधींबाबतची नाराजी जास्त तीव्र आहे. त्याचवेळी सक्षम पर्याय नसल्याने आहे त्यातलेच बरे उमेदवार निवडून द्यावे लागत असल्याची भावना शहरी भागातही दिसते.

Advertisement

सर्वात प्रथम आपण अहमदनगर महानगरपालिका या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शहरी संस्थेबाबत नगरकरांचे काय मत आहे ते पाहूया. ‘अहमदनगर महापालिकेच्या कामाबाबत आपण कितपत समाधानी आहात’ या प्रश्नावर फ़क़्त 12.9 टक्के लोकांनी ‘खूप समाधानी’ असल्याचे म्हटले आहे. तर, ये..रे..माझ्या मागल्या.. पद्धतीने सध्या कारभार चालू असून तो ‘बरा’ असल्याची भावनाही फ़क़्त 25.8 टक्के लोकांची आहे. यासह या महापालिकेबद्दल नकारात्मक भावना असलेल्यांची टक्केवारी खूप मोठी आहे. तब्बल 61.3 टक्के नगरकरांनी महापालिका प्रशासनाबद्दल ‘असमाधानी’ अशीच भावना व्यक्त केली आहे.

Advertisement

एकूण नगर जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका यांच्यामधील नगरसेवक ‘अकार्यक्षम’ असल्याचीच नागरिकांची भावना आहे. ‘आपले नगरसेवक कसे काम करीत आहेत’ या प्रश्नांवर तब्बल 56 टक्के लोकांनी त्यांचे कार्य ‘वाईट’ असल्याचे म्हटलेले आहे. अनेकांनी आपापल्या भागातील कार्यसम्राट म्हणून मिरवणाऱ्या नगरसेवक मंडळीबद्दल नाराजीची भावना असल्याची प्रतिक्रिया लिहिली आहे. तर, एकूण जिल्ह्यातील नगरपालिका व महापालिका यांच्या कामाबद्दल समाधानाचा टक्काही खूप चांगला आहे असे नाही. त्यातही नगपालिका क्षेत्राचा टक्का चांगला आहे, तर अहमदनगर महापालिका यांचा टक्का यात खूपच नकारात्मक असल्याचे दिसते.

Advertisement

‘नगपालिका / महापालिकेच्या कामाबाबत आपण कितपत समाधानी आहात’ या प्रश्नावर 100 टक्के असमाधानी असल्याची भावना 24 टक्के नागरीकांची दिसते. तर, 100 टक्के समाधानाची भावना 20 टक्के आहे. यासह 50 टक्के समाधानी असल्याचे मत ५६ टक्के नागरिकांनी व्यक्त केलेले आहे. अहमदनगर महापालिका, शेवगाव, पाथर्डी, शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर या शहरातील नागरिकांची नाराजीची भावना जास्त तीव्र आहे. तर, देवळाली प्रवरा, राहुरी, पारनेर, कोपरगाव येथील नगपालिका कार्यक्षेत्रातील प्रशासनावर नागरिक तुलनेने जास्त समाधानी दिसतात.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement

अगोदरच प्रसिद्ध झालेले ‘अहमदनगर सर्वेक्षण’ लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.krushirang.com/tag/survey/

Advertisement

पुढील विश्लेषण प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक असे :

Advertisement
सर्वेक्षणाच्या विश्लेषणातील बातमीचा विषयप्रकाशित होण्याचा संभाव्य दिनांक
शहरी भाग (महापालिका / नगरपालिका) कामाबाबत मुद्देदि. 19 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अकोलेदि. 20 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कोपरगावदि. 21 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : संगमनेरदि. 22 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शिर्डी (राहता)दि. 23 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीरामपूरदि. 24 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : नेवासादि. 25 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : राहुरीदि. 26 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शेवगाव-पाथर्डीदि. 27 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कर्जत-जामखेडदि. 28 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदादि. 29 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : पारनेरदि. 30 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अहमदनगर शहरदि. 1 मे 2021
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply