Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो, महंगाई मार गयी ना..; विक्रमी झटका, पहा कितीने झालीय वाढ..!

मुंबई :

Advertisement

‘महागाईने गृहिणीचे बजेट कोलमडले..’ ‘महंगाई मार गयी..’ अशी वाक्ये आता आपल्याला चिरपरिचयाची झाली आहेत. आपणही आता त्याला सरावलो आहोत. त्यामुळे कितीही महागाई वाढली, तरी आता आपल्याला त्याचा फारसा फरक पडत नाही.. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, मार्च महिन्यातील चलनवाढ नुकतीच जाहीर झाली असून, त्यात विक्रमी महागाई वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामन्याचे कंबरडे मोडले आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसापासून कच्चे खनिज तेल आणि धातूंच्या किमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक किमतींवर आधारित (डब्ल्युपीआय) चलनवाढ मार्च महिन्यात 7.39 टक्के नोंदवली गेली आहे. गेल्या आठ वर्षातील ही सर्वाधिक महागाई आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस देशात प्रदीर्घ काळ लॉकडाऊन होते. त्यामुळे चलनवाढीची टक्केवारी खाली आली होती. त्यानंतर डब्ल्युपीआय चलनवाढ सातत्याने बदलत राहिली. मात्र, मार्च 2021मध्ये घाऊक दरावर आधारित चलनवाढ आठ वर्षात सर्वाधिक उच्चांकी पातळीवर आली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये 4.17 टक्के चलनवाढ होती. मार्च 2020 मध्ये ती 0.42 टक्के होती. मात्र, चालू वर्षाच्या पहिल्या तिन्ही महिन्यांत सातत्याने चलनवाढ होते आहे.

Advertisement

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्च- 2021मधील चलनवाढ 7.39 टक्के इतकी उच्चांकी नोंदवली गेली आहे. यापूर्वी ऑक्टोबर- 2012 मध्ये 7.40 टक्के चलनवाढ नोंदवली गेली होती.
यंदा मार्च महिन्यात डाळी, फळे व तृणधान्ये यांच्या किंमतींत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांचा महागाईचा दर 3.24 टक्क्यांवर गेला. भाज्यांचे भाव मात्र उणे 5.19 टक्के झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही भाववाढ उणे 2.90 टक्के झाली होती. इंधन आणि विजेच्या दरांत मार्चमध्ये 10.25 टक्के वाढ दिसून आली. फेब्रुवारीमध्ये ही वाढ केवळ 0.58 टक्के होती. इंधन दरांतील चलनवाढ ही मुख्यतः पेट्रोल व डिझेलमधील दरवाढीमुळे झाली आहे. याशिवाय धातूंचे भावही मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत.

Advertisement

मार्चमध्ये रिटेल चलनवाढ चार महिन्यांच्या उच्चांकी जात 5.52 टक्के नोंदवली. रिझर्व्ह बँकेने यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यात कोणतेही दर बदल केले नाहीत. आता रिझर्व्ह बँकेने जूनमध्ये संपणाऱया तिमाहीअखेर रिटेल चलनवाढीचे 5.20 टक्क्यांचे लक्ष्य ठेवले आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply