Take a fresh look at your lifestyle.

म्हणून म्युच्युअल फंड तेजीतच; कोरोना संकटातही वाढली ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक..!

मुंबई :

Advertisement

म्युच्युअल फंड (Mutual Fund) उद्योग देशात आता चांगलाच स्थिरावला आहे. रोज नवनवे शिखर गाठत आहे. कोरोना संकटाचा फास आवळत असतानाही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Investments) वाढत आहे. गेल्या वर्षी भारतात धडकलेल्या कोरोना संकटाने भांडवली बाजाराची धूळदाण उडाली.

Advertisement

सुरुवातीला शेअर बाजारात (Indian Share Market) मोठी घसरण झाली. त्याचे पडसाद म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरही झाले होते. मात्र, त्यानंतर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे लोकांचा ओघ वाढू लागला. मागील वर्षभरात म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.
सर्वच म्युच्युअल फंड योजनांमधील एकूण मालमत्ता तब्बल ३१.४३ लाख कोटी रुपये इतक्या विक्रमी पातळीवर गेली आहे. त्यात २०२०-२१ या वर्षात ४१ टक्के वाढ झाली आहे. क्रिसिल या पत मानांकन संस्थेच्या अहवालानुसार, मार्चअखेर म्युच्युअल फंडातील एकूण मालमत्ता ३१.४३ लाख कोटी इतकी झाली आहे.

Advertisement

दरम्यान, मार्च महिन्यात फंडातून गुंतवणूक काढून घेण्यात आल्याचे दिसले. मार्चमध्ये ‘ओपन एंडेड डेट’ फंडामधून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेत एक टक्का घसरण झाल्याचे ‘क्रिसिल’ने म्हटलं आहे. मार्च महिन्यात म्युच्युअल फंडामधून २९ हजार ७४५ कोटीची गुंतवणूक काढून घेण्यात आली. त्यामुळे एकूण मालमत्ता ३१.४३ लाख कोटी झाली. फेब्रुवारीअखेर म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता ३१.६४ लाख कोटी होती.

Advertisement

वार्षिक आधारावर मात्र २०२०-२१ हे वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी चांगले राहिले. सर्वच म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीचा ओघ मागील वर्षभरात वाढला. त्यामुळे म्युच्युअल फंडाची एकूण संपत्ती ४१ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षभरात २.०९ लाख कोटींची गुंतवणूक झाली. ‘ओपन एंडेड डेट’ फंडामधून वर्षभरात ५२ हजार ५२८ कोटीची गुंतवणूक काढून घेण्यात आली. मार्च २०२० नंतर ही सर्वाधिक रक्कम ठरली आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply