Take a fresh look at your lifestyle.

स्पेशल ऑफर : लस घेतानाचे फोटो काढा, ‘इतक्या’ रुपयांचे बक्षीस मिळवा..!


मुंबई :

Advertisement

आपल्यापैकी अनेकांनी कोरोना लस घेतली. लस घेतल्यावर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची तर स्पर्धा लागली होती. त्यातून काही विनोदी मिम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले. तुमच्या फोटोवर ‘लाईक्स’ आणि ‘कमेंट्स’चा पाऊस पडला असेल. त्यातून तुम्हाला मानसिक समाधानाखेरीज काहीच मिळणार नाही. मात्र, तुम्ही जर लस घेताना काढलेले फोटो योग्य ठिकाणी ‘पोस्ट’ केले, तर तुम्हाला ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे..!

Advertisement

देशात कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट आली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी, लशीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. ही लस संपूर्ण सुरक्षित असून, ती कुटुंबातील प्रत्येकाने घ्यायला हवी, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.
My Gov कडून लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक मोहीम चालवली जात आहे. त्यानुसार कोविड-१९ची लस तुम्हाला अजून घ्यायची असेल, तर तुम्हाला ५ हजार रुपये जिंकता येणार आहेत. यासाठी फक्त तुम्हाला लस घेतेवेळी एक फोटो क्लिक करायचा आहे. त्यासोबत एक चांगली टॅगलाइन देणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जात आहे.

Advertisement

कसे जिंकाल बक्षीस?
My Gov च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाही सदस्याने लस घेत असलेला फोटो एका चांगल्या टॅगलाइनसोबत My Gov च्या वेबसाईटवर पोस्ट करायचा. टॅगलाइनमध्ये लसीचे महत्त्व कसे आहे, यासंबंधी माहिती देणे आवश्यक आहे. यातून नागरिकांना प्रोत्साहन मिळायला हवे. प्रत्येक महिन्यात १० चांगली टॅगलाइन व फोटो पोस्ट करणाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जात आहे.
हे लक्षात ठेवा!
हा उपक्रम ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यात सहभागी व्हायचे असेल, तर लस घेतानाचाच फोटो असला पाहिजे. या दरम्यान, कोविडच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. ज्यात मास्क, सोशल डिस्टन्सचा समावेश आहे.

Advertisement

लशींसाठी करा येथे अर्ज!
तुम्हाला लस घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्ही http://cowin.gov.in या वेबसाइटवर जाऊन ‘अडवॉन्स्ड अपॉइंटमेंट’ घेऊ शकता. तसेच लशीसाठी ‘ऑन साइट रजिस्ट्रेशन’सुद्धा करू शकता. शिवाय तुम्ही ‘COWIN पोर्टल’ किंवा ‘आरोग्य सेतु’ अॅपवरही रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट घेऊ शकता.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply