Take a fresh look at your lifestyle.

रोहित पवारांना भाजपने दिलेय ‘असे’ प्रत्युत्तर; पहा कोणता फोटो केलाय शेअर

पुणे :

Advertisement

रेमडेसीवीरचा काळाबाजार आणि त्यावरील राजकारण हा सध्या महाराष्ट्रातील ट्रेंडमध्ये असलेला विषय आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार भूमिका मांडताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. ब्रूक फार्मासाठी धावतपळत आलेल्या भाजपला हा टीका झोंबली आहे. त्यामुळे त्यांनी आता रोहित पवार यांना प्रत्युत्तर देण्याला सुरुवात केली आहे.

Advertisement

रोहित पवार यांनी ट्विटरवर म्हटले होते की, ब्रूक फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्याला रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्यावरून वलसाड पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण याच कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेंव्हा त्यांना सोडवायला राज्याचे विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले. कोरोना संपल्यावर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायला तुम्ही मोकळे आहातच, पण आजही तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. आम्ही मात्र लोकांचे जीव वाचवण्याचा आमच्यापरीने पूर्ण प्रयत्न करतच राहू!

Advertisement

BJP MUMBAI on Twitter: “वा उद्धवा वा!!! सरकारमध्ये असलेले नेते रेमेडिसिव्हीर सोबत फोटोबाजी करतात तर त्यांना सुट. आणि जी कंपनी राज्याला ५० हजार रेमेडिसिव्हीर पुरवणार त्याला अटक ! #MahaCovidFailure https://t.co/iv6R42w25j” / Twitter

Advertisement

त्यावर मुंबई भाजपने त्यांचा एक फोटो शेअर करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर जिल्ह्यात रेमडेसीवीर औषधाचा बॉक्स देतानाचा रोहित पवार यांचा फोटो भाजपने शोधला आहे. त्यानुसार त्यांनी यात चमकोगिरी केल्याचा आरोप केला आहे. मुंबई भाजपने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, वा उद्धवा वा!!! सरकारमध्ये असलेले नेते रेमेडिसिव्हीर सोबत फोटोबाजी करतात तर त्यांना सुट. आणि जी कंपनी राज्याला ५० हजार रेमेडिसिव्हीर पुरवणार त्याला अटक !

Advertisement

इकॉनॉमिक टाईम्स यांची ब्रूक फार्मा यांच्याबाबतची बातमीही पवारांनी शेअर केली आहे. पुढे म्हटले आहे की, ज्या जनतेने ५ वर्षे राज्याची सत्ता विश्वासाने त्यांच्याही हाती दिली होती, याचीतरी जाणीव ठेवून राज्याची अडवणूक न करता आवश्यक ती औषधं केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजपने राज्याला उपलब्ध करून द्यावीत. मग नेहमीप्रमाणे भले त्यांनी याची जाहिरात करून राजकीय भांडवल केलं तरी हरकत नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “कोरोना संपल्यावर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायला तुम्ही मोकळे आहातच, पण आजही तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. आम्ही मात्र लोकांचे जीव वाचवण्याचा आमच्यापरीने पूर्ण प्रयत्न करतच राहू! https://t.co/a2NawLwj2H” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply