Take a fresh look at your lifestyle.

ब्रूक फार्माच्या मुद्द्यावर रोहित पवारही झाले आक्रमक; पहा काय म्हटलेय देवेंद्र फडणवीसांना

पुणे :

Advertisement

रेमडेसीवीरचा काळाबाजार हा आरोग्य कमी आणि राजकीय मुद्दा करण्यात महाविकास आघाडी आणि भाजपला यश आलेले आहे. ब्रूक फार्मा यांच्यासाठी धावत-पळत येऊन पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या भाजप नेत्यांच्या कृतीमुळे महाराष्ट्रात सध्या हा विषय ट्रेंडमध्ये आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी याबाबत भूमिका मांडताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

Advertisement

रोहित पवार यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ब्रूक फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्याला रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्यावरून वलसाड पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण याच कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेंव्हा त्यांना सोडवायला राज्याचे विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले. कोरोना संपल्यावर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायला तुम्ही मोकळे आहातच, पण आजही तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. आम्ही मात्र लोकांचे जीव वाचवण्याचा आमच्यापरीने पूर्ण प्रयत्न करतच राहू!

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “ब्रूक फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्याला रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्यावरून वलसाड पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण याच कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेंव्हा त्यांना सोडवायला राज्याचे विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले. https://t.co/u3JLykESpm” / Twitter

Advertisement

इकॉनॉमिक टाईम्स यांची ब्रूक फार्मा यांच्याबाबतची बातमीही पवारांनी शेअर केली आहे. पुढे म्हटले आहे की, ज्या जनतेने ५ वर्षे राज्याची सत्ता विश्वासाने त्यांच्याही हाती दिली होती, याचीतरी जाणीव ठेवून राज्याची अडवणूक न करता आवश्यक ती औषधं केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजपने राज्याला उपलब्ध करून द्यावीत. मग नेहमीप्रमाणे भले त्यांनी याची जाहिरात करून राजकीय भांडवल केलं तरी हरकत नाही. आता यावर महाराष्ट्र भाजप आणि फडणवीस व त्यांचे कार्यकर्ते कोणती प्रतिकिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “कोरोना संपल्यावर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायला तुम्ही मोकळे आहातच, पण आजही तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. आम्ही मात्र लोकांचे जीव वाचवण्याचा आमच्यापरीने पूर्ण प्रयत्न करतच राहू! https://t.co/a2NawLwj2H” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply