Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : त्सुनामीचं आलीये… हा काळ मोठा कठीण आला राव….

भयंकर…भयाण…आणि भीषण… लाट येणार असं कळलं होतं. पण सध्या तर कोरोनाची त्सुनामीचं आलीये…गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, जात-धर्म कसला-कसला भेद न ठेवता ही त्सुनामी सगळं गिळू पाहती आहे… काल परवापर्यंत सोबत केलेली, बोललेली माणसं अशी अचानक निघून चालली आहेत… तद्दन क्रूरपणा आहे हा… किती हतबल  करावं नियतीने… आता संपाव हे सगळं, देखवेना हे डोळा…

Advertisement

लेखक : अभिजीत अनाप (पुणे)

Advertisement

आपणही  काहीअंशी आहोत जबाबदार याला. सांगितलं, वाचलं, ऐकलं होतं की भयाण संसर्गजन्य आजार आहे हा, तर सगळे निर्बंध पाळा… आपल्याच हितासाठी होतं, आहे आणि राहिल… पण आपण निघालो मोठे शहाणे.. नियम आणि कायदे असतातच मोडण्यासाठी यांतच आपल्याला मोठेपणा. मग फसलो की आपण या कोरोनाच्या जाळ्यात… दररोज सकाळपासून फोन सुरू होतात,  “बेड मिळेल का?” “ऑक्सिजन बेड कुठं शिल्लक आहे का?” ” व्हेंटिलटर बेड हवाय हो,स्कोर 20 च्या पुढे गेलाय आणि ऑक्सिजन 70 पर्यंत खाली आलाय, मिळेल का व्हेंटिलटर?” “प्लाझ्मा मिळेल का?” *”इंजेक्शन मिळेल का कुठे?”

Advertisement

काय उत्तरे द्यावीत? नाहीयेत हो समाधान देणारी उत्तरे… ह-त-ब-ल आहेत सगळे. उर दडपतो फोन उचलायला… शक्य होईल तेवढी सगळेच जण आपापल्या परीने मदत करताहेत…  आभाळ खरंच फाटलंय. पण आपण हिंमत नाही हारायची… अशा अनेक लाटा पचवून संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभा राहिलेली माणसांची जमात आहे आपली. आपण हार थोडी मानणार आहे…बिलकुल नाही… आता एक लाट येऊन गेलीय. त्सुनामीचा अनुभव घेतोय पुढं काय होईल कल्पना नाहीये. मग आपण आता काळजी घेऊयात

Advertisement

व्हर्चुअल नाही.. खरी-खुरी रियल… सगळे निर्बंध, सगळ्या सूचना तंतोतंत पळूयात… आरोग्य यंत्रणा, प्रशासन, पोलीस, सामाजिक संस्था अशी सगळी जी मंडळी या कोरोनाला थोपवण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. अहोरात्र स्वतःची, कुटुंबातील लोकांची काळजी न करता युद्ध लढत आहेत त्यांच्यावरील ताण हलका करूयात… दुर्दैवाने जे स्नेहीजन कोरोनामुळे बाधित होऊन बरे झालेत. त्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्लाझ्मा थेरपी खुप उपयुक्त आहे. वेळेत रुग्ण बरा झाला तर ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा तुटवडा जाणवणार नाही… जाताजाता इतकंच की, कोरोनाची साखळी तोडल्याशिवाय त्याचा प्रसार थांबणार नाही. त्यासाठी जे काय-काय करायचं आहे ते सगळं आपल्याला ठाऊक आहे. त्याचं अनुपालन करूयात… या रोगाला हद्दपार करूयात… आपल्या संपर्कातील प्रत्येक जण महत्वाचा आहे. आपल्याला सगळ्यांसह, सगळ्यांसोबत आनंददायी राहण्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा. काळजी घ्या… शेवटी या कोरोनाला इतकंच सांगायचंय की, “जबतक तोडेंगे नहीं, तबतक छोडेंगे नहीं…”

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply