Take a fresh look at your lifestyle.

करोना संकटातही ‘त्या’ 5 शेअर्सने केलेय मालामाल; पहा कशाचा आहे परिणाम

मुंबई :

Advertisement

गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारामध्ये (Indian Share Market) मंदीचे वारे दिसले. परिणामी अनेक गुंतवणूकदारांची (Investment) धाकधूक वाढली आहे. कोरोनाच्या रेकॉर्ड रुग्णवाढीमुळे लागू होत असलेले निर्बंध एकूणच जगाची आणि मग गुंतवणूकदारांना चिंता वाढवणारे आहेत. मागील आठवड्यात सुरुवातीला सोमवारी 12 एप्रिल रोजी सेन्सेक्समध्ये सुमारे 3.4 टक्क्यांच्या घसरणीनंतरचा बाजाराची दिशा स्पष्ट झाली होती. मात्र, त्या पडत्या कालावधीतही काही शेअर वधारले. आपण पाहूयात ते वधारलेले प्रमुख 5 शेअर कोणते.

Advertisement
  1. सिप्ला (Cipla) (शेअर किंमत 938.05 | एकूण वाढ 6.23%) : मुंबईमध्ये हेडक्वार्टर असलेली ही एक प्रसिद्ध फार्मा कंपनी  आहे. सिप्ला ही बर्‍याच देशांमध्ये काम करणार्‍या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीची बाजारपेठ 75,650 कोटी रुपये आहे. कंपनीचा शेअर फ़क़्त गेल्या 1 वर्षात 56% वाढला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत सिप्लाचा निव्वळ नफा सप्टेंबरच्या तिमाहीच्या 661 कोटींच्या तुलनेत वाढून 752 कोटी झाला आहे.
  2. विप्रो (Wipro) (शेअर किंमत 469.20 | एकूण वाढ 4.24%) : बंगलोर येथे मुख्यालय असलेली विप्रो आयटी आणि कंझुमर गुड्समधील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. 2,57,081 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या समभागाने गेल्या 1 वर्षात 150% इतका जबरदस्त परतावा दिला आहे. मार्च तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफा डिसेंबरपेक्षा जास्त आहे.
  3. महिंद्रा & महिंद्रा (Mahindra & Mahindra) (शेअर किंमत 821.65 | एकूण वाढ 3.86%) : मुंबईत मुख्यालय असलेली महिंद्रा आणि महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय ऑटो सेक्टर कंपनी आहे. 1,02,146 कोटींचे मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या समभागात मागील 52 आठवड्यांत 130 टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर तिमाहीत महिंद्रा अँड महिंद्राचा तोटा झाला होता. आताही परिस्थिती खूप चांगली नाही. मात्र, ट्रॅक्टरच्या खरेदीत वाढ झाल्याचा फायदा कंपनीला होत आहे.
  4. ओएनजीसी (ONGC) (शेअर किंमत 107.30 | एकूण वाढ 3.37%) : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली ही महारत्न कंपनी भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू उत्पादक आहे. 1,34,986 कोटी रुपयांच्या मार्केट कॅप असलेल्या ओएनजीसीच्या समभागात गेल्या 1 वर्षात 42% वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत 5150 कोटी वरून कमी झाला आणि डिसेंबर तिमाहीत 3512 कोटी झाला आहे.
  5. डॉ. रेड्डी लॅब (Dr. Reddy’s Lab) (शेअर किंमत 4893.25 | एकूण वाढ 2.79%) : डॉ. रेड्डी लॅब्स हैदराबादमधील बहुराष्ट्रीय फार्मा कंपनी आहे. कंपनीची मार्केट कॅप 81,375 कोटी असून गेल्या 12 महिन्यांत 26 % नफा वाढ नोंदवली गेली आहे. सप्टेंबरमध्ये 764 कोटींच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १२ कोटींवर आला आहे. मात्र, कंपनीवर गुंतवणूकदारांनी वूश्वास ठेवलेला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply