Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. फडणविसांवर काँग्रेसचा गंभीर आरोप; 45 पेक्षा कमी वय असतानाही पुतण्याला करोना डोस ..!

पुणे :

Advertisement

सध्या देशभरात भाजप आणि इतर राजकीय पक्ष यांच्या करोना लस व रेमिडीसिवीर या औषधाचे राजकारण जोमात आहे. महाराष्ट्र सरकारला बाजूला ठेऊन थेट कंपनीकडून 50 हजार रेमिडीसिवीर डोस आणण्यासाठीचे प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपवर टीकेची झोड उठलेली आहे. त्यातच आता 45 वर्षांपेक्षा कमी वय असूनही करोना लसचे दोन्ही डोस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने घेतले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “बाअदब बामुलायजा होशियार शहेनशाह ए हिन्द आलमपनाह नरेंद्र मोदी जी के शागिर्द और मोदीया सल्तनत के सिपासालार देवेंद्र फडणवीस जी के भतीजे नवाबजादे तन्मय फडणवीस जी वैक्सीन लेने पधार रहे हैं। कोई न पुछो उनसे उमर। फडणवीस जी की लगी है जो मुहर। उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है। https://t.co/sgffzy8aob” / Twitter

Advertisement

कर्नाटक काँग्रेसचे तरुण नेते आणि युथ काँग्रेसचे प्रचारप्रमुख असलेल्या वाय. बी. श्रीवास्ता यांनी याबाबतच्या माहितीचे ट्विट केले आहे. त्यांनी त्यात तन्मय फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात पुढे म्हटले आहे की, फडणवीस साहेब, तुमचा पुतण्या 45 पेक्षा जास्त वयाचा आहे का? जर त्याचे वय जास्त नसेल तर मग तो लसचे दोन्ही डोस घेण्यासाठी कसाकाय पात्र ठरला? हेही रेमिडीसिवीर औषधाप्रमाणे आहे का? ते जसे आपण आपल्याच कुटुंबियासाठी ठेवले आहे का? देशभरात नागरिक मरत आहेत. लस कमी आहेत आणि त्याचवेळी फडणवीस कुटुंब मस्त सुरक्षित आहे की..!

Advertisement

Srivatsa on Twitter: “Dear @Dev_Fadnavis, is your Nephew Tanmay Fadnavis 45+ years old? If not, how is he eligible for taking the Vaccine? Just like Remdesivir, are you hoarding Vaccines & giving it to your family members? People are dying. There is Vaccine Shortage. But Fadnavis family is Safe. https://t.co/6vjwIqNuEI” / Twitter

Advertisement

विशेष म्हणजे तन्मय यांनी टाकलेले फोटो आणि त्यावरील प्रतिक्रिया यांचाही व्हिडिओ सध्या सोशल मिडीयामध्ये जोरात शेअर होत आहे. अनेकांनी कमी वयात हा डोस मिळाला कसा, असेच प्रश्न त्यात केलेले दिसतात. काहींनी याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. मात्र, Tanmay Fadnavis (@tanmayfadnavis) • Instagram photos and videos तन्मय फडणवीस यांच्या इंस्टाग्रामवर सध्या असे कोणतेही फोटो दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांनी हे फोटो डिलीट केलेत, की त्यांच्या नावाने अशी अफवा पसरवली गेली हे स्पष्ट नाही. मात्र, शेकडो लोकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. याचे फोटो डिलीट होण्याच्या शक्यतेने त्यांनी त्याचे व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट घेऊन ठेवले आहेत. आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर कोणती प्रतिकिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही याबाबत ट्विट केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

nameit_opind on Twitter: “@Dev_Fadnavis your nephew got his second shot of the vaccine. Is he above 45 years of age? @COVIDNewsByMIB @narendramodi @SaketGokhale https://t.co/hXRstJzGBo” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply