Take a fresh look at your lifestyle.

आणि 18 जण करोना रुग्ण हॉस्पिटलमधून पाळले; होते कुंभमेळ्यातील भाविक

दिल्ली :

Advertisement

सध्या देशभरात करोना कहर जोरात आहे. अशावेळी हरिद्वार येथे कुंभमेळा आणि निवडणूक फिव्हरही कमी झालेला नाही. निवडणूक होत असलेल्या राज्यातील रुग्णसंख्या वाढत असतानाच कुंभमेळ्याच्या भाविकांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच असे 18 करोना पॉजिटिव रुग्ण रुग्णालयातून पळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Advertisement

राजस्थानातील 19 भाविक हरिद्वार कुंभात सहभागी होण्यासाठी आले होते. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर ज्यांना टिहरी जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे सर्व भाविक कोरोना संसर्गातून बरे होत आले होते. पण त्यादरम्यान 18 एप्रिल रोजी हे भाविक रुग्णालयातून पळून गेले. या घटनेनंतर प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisement

आरोग्य विभागाच्या अधिका्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे की, या प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाने राजस्थान सरकारला याबाबत माहिती दिली आहे. बर्‍याच राज्यांनी हरिद्वार कुंभमेळा येथून परत आलेल्यांना घरात 14 दिवस अनिवार्य विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक 12, 13 आणि 14 एप्रिल रोजी मेळ्यात 50 लाखाहून अधिक लोकांनी स्नान केले आहे.

Advertisement

यानंतर बरेच साधू आणि सामान्य लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागल्याचे आकडे येत आहेत. यानंतर आनंदी अखाडा आणि निरंजनी अखाडा यांनी 17 एप्रिल रोजी मेळ्याचा समारोप जाहीर केला. 17 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून कोरोना पॉझिटिव्ह जूना अखाडाचे प्रमुख महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांच्याशी त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना कुंभ प्रतीकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्याचवेळी रुग्ण पळून जाण्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply