Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा..’; पहा कोणी केलीय ही मागणी

मुंबई :

Advertisement

जमैकाचा स्टार धावपटू योहान ब्लेक हा क्रिकेटचा चाहता आहे आणि एबी डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय मागे घेवून पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे आणि टी २० वर्ल्ड कपसह दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करावे, अशी विनंती केली आहे. डिव्हिलियर्स स्वत: या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक आहे आणि इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटी तो दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्याशी बोलण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

Yohan Blake on Twitter: “Wow de Villiers is on a different level. South Africa 🇿🇦 come on you need this man. @ABdeVilliers17 @OfficialCSA” / Twitter

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी चेन्नई येथे खेळलेल्या सामन्यानंतर ब्लेकने ट्वीट केले आहे की,व्वा, डिव्हिलियर्स, तू वेगळ्या स्तराचा खेळाडू आहेस, दक्षिण आफ्रिका तुम्हाला या खेळाडूची आवश्यकता आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता ब्लेक हा १०० मीटर युथ वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्याने विराट कोहली आणि डिव्हिलियर्समुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली आहे. डिव्हिलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कोलकाता नाईट रायडर्ससोबत झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकल्यानंतर तो म्हणाला की, ‘आयपीएल दरम्यान आमच्यात थोडीशी चर्चा करावी लागेल. पण हो, आम्ही आधीच याबद्दल बोलत आहोत.

Advertisement

३७ वर्षीय या खेळाडूने असेही म्हटले आहे की, जर माझ्यासाठी जागा नसेल तर काही हरकत नाही. मी यात सामील होऊ शकलो आणि मला स्थान मिळाल्यास ते छान होईल. आयपीएलच्या शेवटी मी मार्क बाऊचर यांच्याशी संभाषणाची वाट पाहत आहे आणि आम्ही त्यादृष्टीने योजना आखू, असे तो म्हणाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply