Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून सनरायझर्स हैदराबादची पराभवाची झाली हॅटट्रिक; मांजरेकर यांनी सांगितले पराभवाचे कारण

मुंबई :  
आयपीएलचा यंदाचा हंगाम डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादसाठी चांगला ठरताना दिसत नाहीये. हैदराबाद संघाचा प्रमुख सदस्य केन विल्यमसनची अनुपस्थिती संघास चांगचीच जाणवत असून यामुळे या स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाचा सामना या संघाला करावा लागला आहे. पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सकडून संघाला १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. एक वेळ अशी होती की, जॉनी बेयरस्टो आणि वॉर्नरच्या दमदार खेळीच्या बळावर हैदराबादचा संघ सामना सहज जिंकेल. पण या दोन्ही फलंदाजांच्या विकेट गमावल्यानंतर हैदराबादचा डाव पत्यांच्या बंगल्यासारखा कोसळला.

Advertisement

हैदराबाद टीमचा कोणताही फलंदाज चांगली खेळ करू शकला नाही. संघाने पराभवाची हॅटट्रिक केल्यानंतर माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पराभवाचे कारण सांगितले आहे. सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर त्यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘मला माफ करा, पण जेव्हा कोणी अभिषेक शर्मा, विराटसिंग आणि अब्दुल समद या खेळाडूंना त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकत्र खेळायला संधी देईल, तो संघ विजयापासून वंचितच राहणार’ असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

Sanjay Manjrekar on Twitter: “Sorry to say, but anyone that picks Abhishek Sharma, Virat Singh and Abdul Samad all together in one playing XI does not deserve to win.” / Twitter

Advertisement

या सामन्यात हैदराबादच्या तीनही तरुण खेळाडूंची कामगिरी काही खास नव्हती. या सामन्यात विराटने १२ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ११ धावा केल्या तर अभिषेकने अवघ्या २ धावा केल्या. या दोघांना लेगस्पिनर राहुल चहरने पॅव्हेलियनमध्ये धाडले. अब्दुल समद हा संघाचा नियमित सदस्य असूनही या सामन्यात अनलकी ठरला, हार्दिक पांड्याने केलेल्या अप्रतिम थ्रोमुळे तो धावबाद झाला.

Advertisement

सनरायझर्स हैदराबादला सध्या मधल्या फळीत केन विल्यमसनची कमतरता जाणवत आहे. केनच्या संघात सामील होण्याबाबत कॅप्टन वॉर्नरने म्हटले आहे की, विल्यमसन दुखापतीतून सावरेल आणि लवकरच संघात सामील होईल. वॉर्नर म्हणाला, मी फिजिओशी बोललो आहे आणि विल्यमसमन दुखापतीतून बरा होत आहे. जेव्हा तो फिट असेल, तेव्हा त्याला संधी मिळेल. हैदराबादचा पुढील सामना २१ एप्रिल रोजी पंजाबविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर खेळवला जाईल.
संपादन : अपेक्षा दाणी  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply