Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते

मुंबई :

Advertisement

विराट कोहलीच्या नेतृत्वात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. जगातील दोन सर्वोत्कृष्ट मर्यादित षटकांचे कर्णधार असलेल्या इयोन मॉर्गन आणि विराट कोहली यांच्यातील सामन्यात बंगळुरूच्या संघाने मागील दोन्ही सामने जिंकल्यामुळे त्यांचे पारडे थोडे जड आहे. इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन आपल्या कार्यकुशल रणनीती व व्यवस्थापनासाठी परिचित असून केकेआरची मोहीम रुळावर आणण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

Advertisement

केकेआरची मधली फळी अपेक्षेप्रमाणे खेळ करत नसल्याने त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यानंतर केकेआरची मधली फळी मुंबईविरुद्धच्या सामन्यात पत्त्यांचा कार्डांप्रमाणे कोसळली आणि १३ सामन्यात त्यांना १२  वा पराभव पत्करावा लागला. मॉर्गनने गोलंदाजीत कर्णधारपदाचे कौशल्य दाखवून मुंबईला १५२ धावांवर रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजीमुळे अष्टपैलू आंद्रे रसेलने सहा गडी बाद केले,  पण चांगली फलंदाजी करण्यात त्याला अपयश आले. दोन सामन्यात तो केवळ १४  धावा करू शकला आहे.

Advertisement

 आरसीबीसमोरची समस्या म्हणजे कोहली,  एबी डिव्हिलियर्स,  ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पद्धिकल यांच्या उपस्थितीत आरसीबी आपली पूर्ण क्षमता दर्शवू शकलेला नाही,  परंतु आरसीबीने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. हर्षल पटेल गोलंदाजीत प्रभावी बदल करत असताना मधल्या फळीत मॅक्सवेलने आपली भूमिका चांगली पार पाडली आहे. कोहली मात्र आपल्या संघाची विजयी मोहीम सुरू ठेवण्यासाठी कटीबद्ध असून त्यांच्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Advertisement

या सामन्यात दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते ते जाणून घेऊ या :

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हनः इयन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), साकिब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.

Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्ले इलेव्हनः विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पद्धिकल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, डॅन ख्रिश्चन, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

Advertisement

 संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply