Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : हार्दिक पांड्याच्या रॅपिड थ्रोची कमाल, वॉर्नर न समद थेट पॅव्हेलियनमध्ये

मुंबई :

Advertisement

मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमधील कालच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या फिल्डिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले की मैदानावरील त्याची फिटनेस किती उत्कृष्ट आहे. हार्दिकने हैदराबादविरुद्ध लाजवाब क्षेत्ररक्षण केले आणि त्याच्या शानदार रॅपिड थ्रोमुळे एक नव्हे तर दोन फलंदाज बाद केले. हार्दिकने प्रथम डेव्हिड वॉर्नरला आपल्या अचूक फेकीने बाद केले, तर अब्दुल समदलाही त्याने धावबाद केले. दोन्ही धावबाद हार्दिकने त्याच्या रॅपिड डायरेक्ट हीट थ्रोद्वारे केले. हार्दिकने अत्यंत चपळाईने आणि वेगाने दोन्ही थ्रो फेकले आणि दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत जाण्यास भाग पाडले.

Advertisement

सर्वप्रथम, हैदराबादच्या डावाच्या १२ व्या षटकात पोलार्डच्या गोलंदाजीवर विराटसिंगने हलक्या हाताने ऑफ साइडला खेळून वेगवान धावा घेण्याचा प्रयत्न केला, नॉन-स्ट्राईकरवर उभ्या असलेल्या कर्णधार वॉर्नरनेही धाव घेण्यास सहमती दर्शविली. पण हार्दिकच्या फिटनेससमोर वॉर्नर हतबल झाला आणि रॉकेटच्या वेगाने हार्दिकचा थ्रो स्टंपवर आदळला. वॉर्नर ३४ चेंडूत ३६ धावांवर धावबाद झाला. बाहेर आल्यानंतर वॉर्नर खूप निराश दिसत होता.

Advertisement

वॉर्नरशिवाय समद हार्दिकच्या डायरेक्ट हिट थ्रोचा दुसरा बळी ठरला. अब्दुल समद केवळ ७ धावा काढू शकला आणि संपूर्ण हैदराबाद संघ १३७ धावांवर बाद झाला आणि मुंबईने हा सामना १३ धावांनी जिंकला. अखेरच्या षटकात पुन्हा ट्रेंट बोल्टने कहर केला आणि २ फलंदाजांना बाद झाल्याने हैदराबादचा डाव संपुष्टात आला. मुंबईच्या या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

ABD’s absolute carnage – 76*(34) | Indian Premier League (iplt20.com)

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply