Take a fresh look at your lifestyle.

इंडियन फ्रंटियर फोर्सच्या ताकदीला आव्हान देण्यासाठी चीनी लष्कराने केली ‘ही’ कार्यवाही..!

दिल्ली :

Advertisement

भारत व चीन या दोन्ही शेजारील देशांचे प्रयत्न सुधारण्याचा राजकीयदृष्ट्या प्रयत्न अनेकदा झाला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जीनिपिंग यांना झोपल्यावर झुलवले. मात्र, चीनने तरीही आपली मुजोरी सोडलेली नाही. उलट हा कुरापतखोर शेजारी दिवसेंदिवस आणखी युद्धखोर होत आहे. त्यामुळे जगाने आता या देशाला लक्ष्य केले आहे. त्याच धर्तीवरील पुढचे पाउल म्हणून इंडियन फ्रंटियर फोर्सच्या (एसएफएफ / SFF) ताकदीला आव्हान देण्यासाठी चीनी लष्कराने तयारी केली आहे.

Advertisement

काय आहे इंडियन फ्रंटियर फोर्स?

Advertisement

भारतात तिबेटियन तरुणांची भरती करून स्पेशल फ्रंटियर फोर्सची (Special Frontier Force) स्थापना केली गेली आहे. असे मानले जाते की सुमारे 10 हजार तिबेटियन यात आहेत. 1962 मध्ये स्थापन (1962 India-China War) झालेली ही एसएफएफ भारतीय लष्कराचा भाग नसून थेट भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) हिच्या अखत्यारीत आहे. या युनिटचे कामकाज इतके गोपनीय आहे की सैन्यलासुद्धा ते काय करीत आहे हे अनेकदा माहिती नसते. संरक्षण विभागातील मोजक्या आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनाच याबाबतची माहिती असते. सुरक्षा महासंचालकांमार्फत यांचा अहवाल थेट पंतप्रधानांना पाठवला जातो. म्हणून त्यांच्या ‘पराक्रमाच्या कहाण्या’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. चीन-भारत युद्धानंतर तातडीने एसएफएफची स्थापना झाली होती. तिबेटी लोक (तिबेटी आणि गुरखा) भरती करण्यासाठी हे एक गुप्त युनिट आहे.

Advertisement

सुरुवातीला याला युनिट 22 म्हणून ओळखले जात असे. हे नाव ठेवले गेले कारण ते 22 माउंटन रेजिमेंटचे धनुर्धारी अधिकारी मेजर जनरल सुजनसिंग उबान यांनी हे उभे केले. म्हणूनच त्यांनी त्याच्या रेजिमेंटनुसार नवीन गुप्त युनिटचे नाव ठेवले. यानंतर सैनिकांना विशेष फ्रंटियर फोर्स म्हणून नियुक्त केले गेले आणि ते आता कॅबिनेट सचिवालयांच्या अखत्यारीत आहे.

Advertisement

पूर्व लडाखच्या कैलास रेंजमध्ये चीनला चकित करणाऱ्या भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्स (एसएफएफ) यांच्या जवानांच्या कामगिरीने ड्रॅगन तणावामध्ये आहे. तिबेटी वंशाच्या लोकांनी बनलेल्या या सैन्याच्या कामगिरीने घाबरून चीनने आता त्यांच्या अखत्यारीत असलेल्या तिबेटी तरुणांना आपल्या सैन्यात भरती करण्याचे काम तीव्र केले आहे. यासाठी आता चीन तिबेटमध्ये विशेष भरती मोहीम राबवित आहे. अशा पद्धतीने स्थानिकांना सहभागी करून घेऊन सीमेवर आणखी ताकद वाढवण्याचा चीनी सैन्याचा प्रयत्न आहे. मात्र, विद्रोही तिबेटी त्याला कितपत साथ देतात, हा प्रश्न आहेच की.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply