Take a fresh look at your lifestyle.

‘रेमडेसिवीर हे काही चॉकलेट नाही..’; एक्स आयएएस झगडे यांनी उपस्थित केला ‘तो’ महत्वाचा मुद्दा

मुंबई :

Advertisement

सध्या महाराष्ट्रात करोनाची रुग्णसंख्या वाढत असताना सरकारी आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडीमध्ये यावरून तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यातच राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रेमडेसिवीर या औषधाचा मुद्दा तापवला आहे. त्यांच्या अनेक नेत्यांनी रेमडेसिवीरच्या 50 हजार बाटल्या देण्याच्या घोषणा करून महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी या प्रकरणात आता पोलीसही आणले गेले आहेत.

Advertisement

Mahesh Zagade, IASx on Twitter: “रेमडेसिवीर हे एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे, चॉकलेट नाही. म्हणूनच किरकोळ फार्मसी किंवा डॉक्टर व्यतिरिक्त औषध निर्माण कंपन्या किंवा घाऊक विक्रेते ते रुग्ण किंवा इतर कोणालाहि कायद्याने विकू शकत नाही.” / Twitter

Advertisement

त्याचवेळी राज्याचे माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रेमडेसिवीर हे एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे, चॉकलेट नाही. म्हणूनच किरकोळ फार्मसी किंवा डॉक्टर व्यतिरिक्त औषध निर्माण कंपन्या किंवा घाऊक विक्रेते ते रुग्ण किंवा इतर कोणालाहि कायद्याने विकू शकत नाही. एकूणच मीच हे औषध आणून देतो अशी घोषणाबाजी सुरू असतानाच राज्य सरकारला मग या औषधाच्या बाटल्या का भेटत नाहीत यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply